शहरं
Join us  
Trending Stories
1
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
2
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
3
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
4
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
5
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
6
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
7
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
8
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
9
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
10
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
11
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
12
‘न्याय द्या, तरच भेटीला या’, हा ‘हॅशटॅग’ बनला तर?
13
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
14
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
15
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
16
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
17
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
18
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
19
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
20
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात हेराफेरी

By admin | Updated: October 27, 2015 00:06 IST

वसई-विरार शहर महानगरपालिकेतील ठेक्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन दिले जात नाही.

वसई : वसई-विरार शहर महानगरपालिकेतील ठेक्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन दिले जात नाही. तसेच भविष्य निर्वाह निधी आणि अन्य सुविधाही देण्यात येत नसल्यामुळे या कामगारांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण आहे. ज्या संघटनेकडे या कामगारांचे नेतृत्व आहे. ती संघटनादेखील कामगारांचे प्रश्न हाताळण्याबाबत कुचकामी ठरली आहे.महानगरपालिकेमध्ये ८५ टक्के कर्मचारी ठेक्यावर असून त्यांना ठेकेदाराच्या माध्यमातून वेतन दिले जाते. काही वर्षांपूर्वी वेतन देण्याबाबत ठेकेदार दिरंगाई करत असल्याचे लक्षात आल्यानंतर महानगरपालिकेने त्यांच्या बँक खात्यात वेतन जमा करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, ठेकेदारांनी कर्मचाऱ्यांची बँक खाती उघडली, परंतु त्यांचे एटीएम कार्ड मात्र स्वत:कडे ठेवले. मध्यंतरी, नालासोपारा येथील स्मशानभूमीत काम करणाऱ्या ९ कर्मचाऱ्यांना ठेकेदाराने वेतन दिले नाही. हे प्रकरण उपायुक्त डॉ. अजीज शेख यांच्या कानांवर टाकल्यानंतर त्यांनी संबंधित ठेकेदाराला कानपिचक्या दिल्या आणि या ठेकेदाराने ९ पैकी ६ कर्मचाऱ्यांना वेतन दिले तर उर्वरित ३ कर्मचाऱ्यांना अद्याप ताटकळत ठेवले आहे. राज्य शासनाने पदमंजुरी दिल्यामुळे महानगरपालिकेतील पदे त्वरित भरावीत, अशी मागणी जोर धरत असतानाच ठेकेदारांवर आयुक्त सतीश लोखंडे यांनी गुन्हे दाखल करावे, अशी मागणी केली आहे. (प्रतिनिधी)आपल्याला नोकरी गमवावी लागेल, या भीतीने ठेक्यावरील कामगारांच्या त्रासासंदर्भात कोणीही बोलायला तयार नाही. त्यामुळे आयुक्तांनी पुढाकार घेऊन गैरप्रकार करणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी होत आहे. वेतनामध्ये हेराफेरी करणाऱ्या ठेकेदारांवर त्यांनी गुन्हे दाखल करावे, अशी मागणी केली आहे.