शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019: ...अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकू; रहिवाशांचा संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 01:45 IST

ठाकुर्ली उड्डाणपूल परिसरातील रस्त्यांचे रुंदीकरण, जागा देण्यास विरोध

डोंबिवली : ठाकुर्ली उड्डाणपूल परिसरातील वाहतूक सुरळीत होण्यासाठी तेथील रस्ते रुंदीकरणाचे प्रयत्न केडीएमसी प्रशासनाने सुरू केले असताना त्याला स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध केला आहे. जागा देण्यास नकार दिला असून घराच्या बांधकामाला हात लावला, तर विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घालू, असा पवित्रा शनिवारी रहिवाशांकडून घेण्यात आला. दरम्यान, प्रशासन त्यांच्या भूमिकेवर ठाम असून मार्किंग केल्याप्रमाणे रुंदीकरण होणार असल्याचे स्पष्टीकरण त्यांच्याकडून देण्यात आले.डोंबिवली शहरातील कोपर उड्डाणपूल दुरुस्तीसाठी बंद केल्याने पूर्व-पश्चिम वाहतुकीसाठी एकमेव पर्याय राहिलेल्या ठाकुर्ली उड्डाणपुलावर वाहतुकीचा ताण वाढला आहे. याठिकाणी वाहतूक वाढल्याने येथील काही रस्त्यांवरील वाहतूक एकदिशा करण्यात आली आहे, तर पी १ पी २ पार्किंगची अंमलबजावणीही चालू करण्यात आली आहे. शुक्रवारी केडीएमसीचे आयुक्त गोविंद बोडके यांनी या परिसराची पाहणी केली. वाहतूकव्यवस्था व नियोजनाच्या अनुषंगाने केलेल्या पाहणी दौऱ्यात बेकायदा पार्किंग बंद करून रस्ते रुंदीकरण करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या. त्यानुसार, अधिकाºयांनी ठाकुर्ली उड्डाणपुलालगतचे पूर्वेकडील संभाजी पथ आणि छेडा क्रॉस रोड रुंदीकरणाची कार्यवाही सुरू केली आहे. या रुंदीकरणासाठी घरे आणि अन्य बांधकामांवर मार्किंग केले आहे. हे दोन्ही रस्ते नऊ मीटर असून ते आणखीन तीन मीटरने वाढवायचे असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. यात इमारतींच्या संरक्षक भिंतींसह दोन्ही रस्त्यांच्या मध्यावर असलेल्या वसाहतीमधील २० घरांवरही रुंदीकरणाचा हातोडा पडणार आहे.रुंदीकरणाला स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध केला आहे. वाहतूककोंडीच्या समस्येला प्रशासनाचा नियोजनशून्य कारभारच कारणीभूत आहे. ठाकुर्ली उड्डाणपुलाचे नियोजनच चुकीचे झाले आहे.पूल जोशी हायस्कूलजवळ जो उतरवण्यात आला आहे, ती जागाच चुकीची आहे. याआधी ९० फूट रस्त्यावर पूल उतरवला जाणार होता, पण तेथील घरे वाचवण्यासाठी जोशी हायस्कूल परिसराचा घाट घालण्यात आला. आधीच अरुंद असलेल्या रस्त्यांवर पूल उतरवण्याआधी वाहतूककोंडी होणार, याची जाणीव प्रशासनाला झाली नव्हती का? असे सवाल रहिवाशांनी उपस्थित केले आहेत. आम्ही ६० ते ७० वर्षांपासून याठिकाणी राहत आहोत. आमची जागा रुंदीकरणासाठी देणार नाही. आमच्या घराच्या बांधकामातील एका विटेला जरी धक्का लागला, तरी विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकू, असा पवित्रा रहिवाशांनी घेतला आहे. शनिवारी रात्री झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.निवडणुकांमध्ये मतांचा जोगवा मागणारे आम्हाला न्याय देतील का, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. दरम्यान, रहिवाशांच्या विरोधानंतरही प्रशासन रुंदीकरण करण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याने प्रशासन आणि रहिवासी यांच्यात संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.लवकरच नोटिसा काढणारदोन्ही रस्त्यांवर रुंदीकरण होणे आवश्यक आहे, त्याप्रमाणे मार्किंग करण्यात आले आहे. त्यानुसारच, रुंदीकरण होईल. या कार्यवाहीसाठी लवकरच रुंदीकरणात बाधित होणाºयांना नोटिसा काढल्या जातील, अशी माहिती ‘फ’ प्रभागक्षेत्र अधिकारी दीपक शिंदे यांनी दिली.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Votingमतदान