शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
3
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
5
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
6
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
7
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
8
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
9
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
10
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
11
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
12
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
13
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
14
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
15
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
16
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
17
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
18
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
19
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
20
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'

Maharashtra election 2019 : 5 वर्षांच्या मुलाला विचारले तरी तो सांगेल कोण येणार?- फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 9:51 PM

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवार संजय केळकर यांच्यासाठी ठाण्यात प्रचारसभा घेतली आहे.

ठाणेः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवार संजय केळकर यांच्यासाठी ठाण्यात प्रचारसभा घेतली आहे. यावेळी त्यांनी अनेक विकासाच्या मुद्द्यांना हात घातला आहे. 5 वर्षांच्या मुलाला देखील विचारले तरी तो सांगेल कोण येणार आहे, राहुल गांधी बँकॉकला फिरायला गेले कारण त्यांनाही माहिती आहे कोण येणार?, असं म्हणत त्यांनी आघाडीला टोला लगावला आहे. ठाण्यातल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. शरद पवार यांच्या पक्षाची अवस्था बिकट आहे. इकडे आड तर तिकडे विहीर आहे. आघाडीला समजलं त्यांच्या किती जागा निवडून येणार आहेत, त्यामुळेच सुशील कुमार यांनी एकत्र येण्याचं सल्ला दिल्याचा टोलाही फडणवीस यांनी हाणला आहे.मेट्रोचे जाळे पसरले आहे, संपूर्ण क्षेत्र मेट्रोच्या माध्यमातून तयार केली पाहिजेत. ठाण्यात हायब्रीडच्या माध्यमातूनदेखील इंटर मेट्रो आणू, असंही त्यांनी सांगितलं आहे. प्रदूषण दूर करण्यासाठी ठाणे ते बोरिवली रोपवे आणणार आहे. कोपरी उड्डाणपूल आठ पदरी करणार आहे. वाहतूक कोंडी दूर करणार आहे. टिकुजिनी वाडी ते बोरिवली या ठिकाणच्या बोगद्याचं एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून काम सुरू आहे. अंतर्गत जल वाहतूक करण्यासाठी गडकरी यांनी मंजुरी दिली आहे, लवकरात लवकर ही सेवा सुरू होईल आणि वाहतूक कोंडी दूर होईल, असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत. 

आज सर्व समस्यांना सामोरे जाण्यासाठी आपण हजारो कोटींची कामे करत आहोत, नागरिकांना दिलासा देण्याचे काम आपण करीत आहे. ज्या वेळी निधी लागला ते युतीच्या माध्यमातून देत आलो आहे. येत्या काळात ठाणेकरांसाठी क्लस्टरच्या योजना येणार आहेत. मोदीजींच्याकडून गरिबांना घरे देण्याचे काम युतीकडून होत आहे. गरिबांना एसआरएमधून 300 स्क्वेअर फूटची घरे देणार आहे. नवी मुंबई, मुंबई, ठाणे अशा कॉरिडॉरचा प्रकल्प आणत आहे. 100 टक्के डंपिंग बंद करण्यात येणार असून, प्रदूषणमुक्त आणि चांगली कामे आपण हाती घेतली आहेत. पायाभूत सुविधांसाठी 100 लाख कोटींचे काम होणार आहे. गेल्या 5 वर्षात अनेक कामे केली असून,  14व्या क्रमांकावरून महाराष्ट्र 3 नंबरवर आणून ठेवला आहे. तसेच भविष्यात महाराष्ट्र एक नंबरवर येईल.  उद्योगात देशात पाहिले राज्य महाराष्ट्र आले आहे. परकीय गुंतवणुकीमध्ये देखील महाराष्ट्र पहिला आहे. देशातील एकूण 25% रोजगार महाराष्ट्रात आणले. या सरकारमध्ये कधीही घोटाळे झाले नाहीत. अजून चांगले काम आपल्याला करायचे आहे. मोदींच्या कार्यक्रमाला अमेरिकेत अनेक लोक उपस्थित होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक नेते असे मोदींना संबोधले आहे. भारत हे मजबूत राष्ट्र होत असल्याचं पाकिस्तानलाही समजले आहे. भारत आणि जम्मू काश्मीर बघितले, तर पाकिस्तान रोज कारवाया करत होता आणि मोदी यांनी 370 कलम आणून जम्मू काश्मीरमुक्त केले. भारताच्या जम्मू काश्मीरमध्ये तिरंगा झेंडा फडकवला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019