शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
4
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
5
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
6
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
7
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
8
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
9
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
10
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
11
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
12
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
13
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
15
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
16
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
17
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
18
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
19
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
20
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
Daily Top 2Weekly Top 5

नियंत्रण सुटून दुचाकी घसरल्याने अपघातात दोघे ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2020 20:17 IST

याप्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती ठाणे नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामराव सोमवंशी यांनी दिली. परंतु

ठाणे : भरधाव वेगामुळे नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीस्वारासह त्याच्या सहकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी जेल तलावसमोरील उड्डाणपुलावर घडली. गोल्डन डाईज नाक्याकडून ठाण्याच्या दिशेने येताना भरवेगात नियंत्रण सुटल्याने दुचाकी पुलाच्या कठड्याला धडकली. त्यामुळे गंभीर जखमी झाल्याने दोघेही जागीच गतप्राण झाले. दोन्ही मृतदेह सिव्हिल रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवले असून, याप्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती ठाणे नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामराव सोमवंशी यांनी दिली. परंतु त्यांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत.दरम्यान, शुक्रवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास पूर्वद्रुतगती महामार्गावरील उत्सव हॉटेलसमोर दुचाकी अपघातग्रस्त होऊन दुचाकीस्वार मनोज कदम (40) आणि त्याच्यासोबत असलेली नेहा सुबोधरे (36) हे दोघे जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात नोंद केली आहे, अशी माहिती ठाणे मनपा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आली.