प्रेमात आकंठ बुडालेल्यांच्या मासुंदा तलावात उड्या !

By Admin | Updated: February 1, 2016 01:21 IST2016-02-01T01:21:07+5:302016-02-01T01:21:07+5:30

घरातून प्रेमविवाहाला विरोध असल्याने मासुंदा तलावात नौकाविहार करताना एका प्रेमीयुगुलाने उड्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.

Looted in love-crazed Masooda lake! | प्रेमात आकंठ बुडालेल्यांच्या मासुंदा तलावात उड्या !

प्रेमात आकंठ बुडालेल्यांच्या मासुंदा तलावात उड्या !

ठाणे : घरातून प्रेमविवाहाला विरोध असल्याने मासुंदा तलावात नौकाविहार करताना एका प्रेमीयुगुलाने उड्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवाने तैनात जीवरक्षक जवानांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी त्यांचे प्राण वाचविले. मुलीला आई-वडिलांच्या ताब्यात दिले असून मुलावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत असल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी दिली.
विनोद दिलीप वाघमारे (२१) आणि त्याची मैत्रिण मीना रामाणे (२०, नावात बदल) हे दोघेही भिवंडीतील रहिवासी असून एकमेकांवर त्यांचे प्रेम आहे. दोघेही चार दिवसांपासून घराबाहेर होते. याप्रकरणी मुलीच्या पालकांनी भिवंडी पोलीस ठाण्यात ती हरविल्याची तक्रारही दाखल केली आहे. दरम्यान, त्या दोघांनी लग्नही केल्याचे बोलले जाते. रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ते मासुंदा तलावात नौकाविहार करीत होते. त्यावेळी दोघेही तणावाखाली होते. घरच्यांकडून आपल्या विवाहास संमती मिळणार नसल्याने जीवनयात्रा संपवण्याचा विचार करून त्यांनी अचानक तलावात उडया घेतल्या. त्याचवेळी तेथे असलेल्या जीवनरक्षकांच्या हा प्रकार निदर्शनास आला. सायंकाळी ६.३० वा. च्या सुमारास दोघांनाही सुखरुप बाहेर काढण्यात आले. मुलीला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले असून विनोदवर उपचार सुरू आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Looted in love-crazed Masooda lake!