शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
4
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
5
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
6
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
7
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
8
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
9
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
10
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
11
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
12
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
13
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
14
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
15
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
18
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
19
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
20
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
Daily Top 2Weekly Top 5

साहित्यात तरी भपकेबाजपणा नसावा

By admin | Updated: November 10, 2016 03:09 IST

सर्वत्र जाहिरातींचा भपकेबाजपणा असताना निदान साहित्यात तरी तो नसावा, साहित्य संमेलनाची निवडणूक निकोप-पारदर्शी व्हावी, अशी अपेक्षा ९० व्या साहित्य संमेलनाच्या

डोंबिवली : सर्वत्र जाहिरातींचा भपकेबाजपणा असताना निदान साहित्यात तरी तो नसावा, साहित्य संमेलनाची निवडणूक निकोप-पारदर्शी व्हावी, अशी अपेक्षा ९० व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे उमेदवार साहित्यिक प्रा. प्रवीण दवणे यांनी येथे व्यक्त केली.‘श्रीकला संस्थे’तर्फे येथील मोरया सभागृहात दवणे यांची प्रकट मुलाखत झाली. यावेळी त्यांनी उपरोक्त अपेक्षा व्यक्त केली. संस्थापिका दीपाली काळे यांनी त्यांची मुलाखत घेतली. ते म्हणाले की, ‘साहित्यात आपापल्या परिने सगळ्यांचेच योगदान आहे. आता मतदारांनी योग्य तो संमेलनाध्यक्ष निवडायला हवा. केवळ टेबलावर पुस्तकांचे ढीग रचत या स्पर्धेत उतरणाऱ्यांना निवडून द्यायचे की, खरोखरच त्याचा मनमुराद आनंद वाचकांना कोण देत आहे, या निकषांनुसार निखळपणे ही निवडणूक व्हावी, एवढेच माझे म्हणणे आहे.’ ‘डोंबिवलीशी माझी जुनी नाळ आहे. मी स.वा. जोशी विद्यालयात शिक्षण घेतले. या शहरात मी पु.भा.भावे, शं.ना.नवरे यांना जवळून बघितले आहे. ३३ वर्षांत मला साहित्यातील दिग्गजांचे मार्गदर्शन मिळाले’, असे त्यांनी पुढे सांगितले.‘संमेलनाच्या निमित्ताने साहित्य चळवळ उभी राहणे आवश्यक आहे. त्यासाठी ग्रामीण भागातील नवोदितांना संधी मिळायला हवी. त्यांच्यासाठी स्वतंत्र व्यासपीठ हवे. ज्यांनी पुस्तके लिहिली आहेत, त्यांच्यासाठी पुस्तक-कवी कट्टा नसावा, तर पुस्तक मार्गदर्शक कट्टा असावा. तसेच ‘संपादक थेट भेटी’ला असा उपक्रम राबवावा,’ असा मानस त्यांनी व्यक्त केला. मराठी साहित्य संमेलन या अगोदर अखिल भारतीय असा शब्द लागतो, हे कोणीही विसरू नये. पण, आपण मात्र केवळ महाराष्ट्रापुरते ते कार्य मर्यादित ठेवतो. अंतिमत: मराठी भाषा छायाचित्रात बंदिस्त होऊ नये. परदेशात आपलीच मुले, मुली ती टिकवण्यासाठी प्रचंड झटत आहेत. त्यांना त्याविषयी प्रचंड आदर, अभिमान आहे. कोशकक्षेच्या बाहेर बघितल्यानंतरच मराठी भाषेची व्याप्ती समजते. हे सगळ्यांनी लक्षात घ्यावे. संमेलनाध्यक्षपदी निवडून कोणीही यावे, पण साहित्याचा प्रसार, त्याची वाढ आणि तळागाळापर्यंत त्याची आवड, अभिरुची निर्माण करणे आवश्यक आहे,’ असेही ते म्हणाले.