शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
3
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
4
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
5
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
6
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
7
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
8
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
9
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
10
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
11
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
12
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
13
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
14
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
15
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
16
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
17
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
18
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
19
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
20
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
Daily Top 2Weekly Top 5

रहिवाशांचा जीव सतत टांगणीला

By admin | Updated: August 21, 2015 23:32 IST

मातृकृपा इमारत पडून झालेल्या दुर्घटनेमुळे ठाकुर्ली-चोळेगावातील ‘त्या’ धोकादायक-अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. केवळ पुनर्वसनाची

अनिकेत घमंडी, डोंबिवलीमातृकृपा इमारत पडून झालेल्या दुर्घटनेमुळे ठाकुर्ली-चोळेगावातील ‘त्या’ धोकादायक-अतिधोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. केवळ पुनर्वसनाची हमी मिळत नसल्याकारणाने या ठिकाणी अजूनही शेकडो रहिवासी जीव मुठीत धरून राहतात. घरात २४ तास पाणी, अभावानेच खंडित होणारा विद्युतपुरवठा हे असले तरी जीवाचीच शाश्वती नसल्याने येथील नागरिक अस्वस्थ आहेत. केडीएमसीची डोळेझाक, दुर्लक्ष, मालकांची दडपशाही आदींमुळे ही स्थिती आहे. त्या दुर्घटनेला महिना होत आला, मात्र अद्यापही धोकादायक इमारतींच्या प्रश्नावर प्रशासनाने, ना राज्य शासनाने तोडगा काढला. जोपर्यंत मालक पुनर्वसनाची हमी देत नाही, तोपर्यंत जागा सोडणार नाही, असा पवित्रा येथील नागरिक घेत आहेत. चोळेगाव या महापालिकेच्या ६३ क्रमांकाच्या वॉर्डाचे हे भयाण वास्तव आहे. अवघ्या फर्लांगावर असलेल्या खंबाळपाडा वॉर्डात झपाट्याने शहरीकरण होत असताना चोळेगावात मात्र दाटीवाटीची स्थिती आहे. एकमेकांना लागून इमारती बांधल्याने अनेक घरांमध्ये सूर्यप्रकाश, खेळत्या हवेचा अभाव आहे. मालक-भाडेकरू यांच्यातील संघर्ष दिसून येतो. महापालिकेने यामध्ये लक्ष घालत तोडगा काढावा, धोरण जाहीर करावे, यासाठी लोकप्रतिनिधी प्रयत्न करीत असले तरी ते तोकडे पडत आहेत. गावठाण असल्याने रस्तेही अरुंद, चिंचोळे. एका वेळी एक बैलगाडीच जाऊ शकेल, अशी भयंकर स्थिती. त्यातच बहुतांशींकडे दुचाकी, चारचाकी असल्याने त्या रस्त्यावर उतरल्यास वाहतूककोंडी होते. त्यामुळे या ठिकाणी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय असूनही सायलेन्स झोनचा पत्ताही नाही. कर्णकर्कश हॉर्न, कोंडी यासह प्रदूषण या सर्वांमुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत. स्वच्छता असली तरीही चाळ संस्कृती असल्याने येता-जाता कचरा टाकला जातो. परिणामी, महापालिकेच्या कचऱ्याच्या गाड्यांनी फेऱ्या मारूनही स्थिती ‘जैसे थे’च. रस्त्याच्या दुतर्फा गाड्या अस्ताव्यस्त लावत असल्यानेही कोेंडीत भर पडते. दुचाकींसह चारचाकींसाठी पार्किंग स्टॅण्ड, ट्रक, टेम्पो टर्मिनस आणि रिक्षा स्टॅण्डचा अभाव असल्याने वाहने कशीही, कुठेही पार्क होतात. हाकेच्या अंतरावर रेल्वे स्थानक असले तरीही तेथे जाताना नागरिकांना अडथळ्याची शर्यत पार करावी लागते. येथील बहुतांशी जागा रेल्वे हद्दीत येत असल्याने अनेकदा एनओसी मिळवताना नाकीनऊ येते.