शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
3
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
4
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
5
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
6
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
7
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
8
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
9
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
10
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
11
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
13
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
14
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
15
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
16
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
17
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
18
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
19
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
20
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

ठाण्यात पोलिसांच्या गणपती बाप्पाने दिले वाहतूक नियमनाचे धडे

By जितेंद्र कालेकर | Published: September 06, 2019 10:22 PM

एकीकडे वाढीव दंडामुळे पोलीस आणि वाहन चालकांमध्ये संभ्रम असतांना दुसरीकडे वाहतूकीचे नियम पाळा आणि अपघात टाळा. आता मोदक आणि पेढयाचा प्रसाद घ्या. पण यापुढे नियम मोडाल तर मात्र दंडाची वाढीव रक्कम भरावी लागेल, असा इशाराच पोलिसांबरोबर असलेल्या गणरायाने वाहन चालकांना ठाण्यात गुरुवारी दिला.

ठळक मुद्दे गांधीमार्गाने दिले मोदक आणि पेढेवाढीव दंडाचीही दिली माहितीठाण्यात पोलिसांची अनोखी शक्कल

ठाणे: विद्येची देवता असलेला गणराय ठाणेकरांना गुरुवारी एका वेगळयाच रुपात पहायला मिळाला. वाहतूकीचे नियम तोडणाऱ्या बेशिस्त चालकांना गांधीगिरीच्या मार्गाने मोदक देत नियम न तोडण्याचा उपदेश वाहतूक पोलिसांसमवेत दिला.केंद्र शासनाने वाहतूकीचे नियम तोडणाऱ्यांवर नियम नियमाप्रमाणे जादा दंड वसूली लागू केली आहे. वाढीव दंडाच्या रक्कमेबाबत अजूनही अनेक वाहन चालक अनभिज्ञ आहेत. परंतू, दंडाची मोठी रक्कम भरण्यापेक्षा वाहतूकीचे नियम पाळा आणि अपघात टाळा यातून तुमचाही आणि इतरांचाही जीव वाचेल, अशा प्रकारची जनजागृती ठाणे शहर पोलिसांच्या ठाणेनगर वाहतूक उपविभागामार्फत गुरुवारी करण्यात आली. तीन हात नाका, ठाणे रेल्वे स्थानक आणि चिंतामणी चौक या गर्दीच्या ठिकाणी हेल्मेट न घालणारे, सिग्नल तोडणारे आणि चुकीच्या दिशेने येणा-या वाहन चालकांना ठाणेनगर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संजय धुमाळ तसेच जमादार मुश्ताक पठाण, पोलीस हवालदार रविंद्र चव्हाण, भिकन शिरसाठ, राजू सानप, पोलीस नाईक दिलीप मारलिकर आणि भूपेंद्रसिंग राजपूत आदींंच्या पथकाने जनजागृती केली. यावेळी नियम मोडणाºया सुमारे ४० ते ५० वाहनचालकांना गणरायाच्या रुपातील वाहतूक मदतनीसाने मोदक आणि पेढयाचा प्रसाद दिला. पण यापुढे जर तुम्ही नियम मोडाल तर मात्र दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही धुमाळ यांनी यावेळी दिला.*असे आहेत नविन नियमविनापरवाना वाहन चालविणे- पाच हजारांचा दंड, भरघाव वेगाने वाहन चालविणे यापूर्वी ४०० रुपयांचा दंड होता. तो आता दोन हजार ते चार हजार करण्यात आला आहे. सिट बिल्ट न घालणाºयांनाही शंभर रुपयांवरुन एक हजारांचा दंड करण्यात आला आहे.

‘‘ नविन नियमानुसार हे हेल्मेट न घालणा-यांनाही शंभर रुपयांवरुन एक हजारांचा दंड आहे. पण वाहन चालकांनीही दंड भरण्यापेक्षा नियम पाळले पाहिजेत. दंड वसूली आणि कारवाई करणे हे आमचे लक्ष्य नाही. तर वाहतूक नियमन करणे आणि नागरिकांची सुरक्षितता राखणे हे कर्तव्य आहे. वाहतूकीचे नियम पाळून अपघात टाळणे गरजेचे आहे.’’संजय धुमाळ, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा, ठाणेनगर

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीtraffic policeवाहतूक पोलीस