नितिन पंडीत -
{{#allowed}} {{#config.logo.enabled}}
{{/config.logo.enabled}}
{{/allowed}}भिवंडी ( दि. २७ ) भिवंडीत अनेक ठिकाणी विषारी व बिनविषारी साप आढळत असतांनाच आता चक्क भिवंडी मनपा आयुक्तांच्या शासकीय बंगल्यातच भला मोठा साप सापडला आहे. रविवारी रात्री शिरा त्याला पकडण्यात आले. साप बंगल्यात शिरला त्यावेळी मनपा आयुक्त सुधाकर देशमुख हे बंगल्यात उपस्थित होते. त्यांनी मनपाच्या अग्निशमन दलास याबाबत माहिती दिली असता अग्निशमन लाचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते.
अग्निशमन दलाचे टीम लीडर लिडींग फायरमन नितीन चव्हाण, फायरमन कांतीलाल गुजर, सुभाष सस्ते यांनी हा साप पकडला आणि त्याला मुंबई नाशिक महामार्गवरील निर्मनुष्य ठिकाणी जंगलात सोडण्यात सोडले. या सापाची लांबी सुमारे सहा फुटांपेक्षा अधिक होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी सापाला पकडल्यानंतर मनपा आयुक्तांसह येथील कर्मचाऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला.