शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
5
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
6
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
7
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
8
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
9
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
10
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
11
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
12
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
13
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
14
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
15
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
16
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
17
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
18
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
19
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
20
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांच्या संख्येत वाढ, केडीएमटी चालकाच्या पायाला दुखापत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2020 14:21 IST

Potholes in Kalyan : रस्त्यावरील खड्डय़ामुळे आतापर्यंत तीन जणांना गंभीर दुखापत झाल्याची घटना महापालिका हद्दीत घडली आहे.

कल्याण - रस्त्यावरील खड्ड्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन सेवेतील चालक अवतार सिंग यांच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. रस्त्यावरील खड्डय़ामुळे आतापर्यंत तीन जणांना गंभीर दुखापत झाल्याची घटना महापालिका हद्दीत घडली आहे.अवतार सिंग हे लालचौकी परिसरातील गणोश मंदिराजवळ राहतात. ते परिवहन सेवेत चालक आहे. काल दुपारी २.३० वाजता त्यांच्याजवळ असलेल्या दुचाकीने कामावर जाण्यासाठी निघाले होते. त्यांची दुचाकी सहजानंद चौकातील एका खड्डय़ात आदळली. त्यांचा तोल जाऊन ते खाली पडले.

डाव्या पायाच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना नीट चालता येत नाही. त्यांनी उपचारासाठी महापालिकेच्या रुक्मीमीबाई रुग्णालयात धाव घेतली. त्यांच्या पायाचा एक्सरे काढण्यात आला आहे. त्याठिकाणी अस्थीव्यंग तज्ज्ञ आज उपलब्ध नसल्याने त्यांना घरी जावे लागले. उद्या ते पुन्हा उपचारासाठी रुग्णालयात जाणार आहेत. दरम्यान काल सायंकाळी डोंबिवली औद्योगिक परिसरातील उस्मा पेट्रोल पंपानजीक आजदे गावात राहणारी एक महिला दुचाकीवरुन चालली होती. रस्त्यावरील खड्डय़ात तिची गाडी आदळून तिच्या गाडीला अपघात झाला. ती गाडीवरु खाली पडली. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. याच वेळी त्याठिकाणाहून जाणारे मनसेचे कार्यकर्ते प्रितेश म्हामूणकर जात होते. त्यांनी हा प्रकार पाहिला.

खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांच्या संख्येत वाढ

महिलेचा मदतीला ते धावले. त्याचबरोबर सोलार टेम्पो चालविणारे राजन मुकादम यांनी त्यांच्या टेम्पोत बसवून महिलेस उपचाराकरीता खाजगी रुग्णालयात नेले. काल मनसेने खड्ड्यांच्या निषेधार्थ खड्डय़ात केप कापून महापालिकेच्या नाकर्तेपणाचा निषेध केला. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आंदोलनाच्या ठिकाणी येत असलेले मनसेचे कार्यकर्ते प्रशांत पोमेणकर यांच्या दुचाकीला खड्डय़ामुळे अपघात होऊन त्यांच्या डाव्या पायाला दुखापत झाली. सात टाके पडले. त्याचबरोबर एका वृत्तवाहिनाचा कॅमेरामॅन प्रथमेश वाघमारे याच्या दुचाकीला ९० फूटी रस्त्यावरील खड्डय़ामुळे अपघात झाला. तो बचावला असला तरी त्याच्या दुचाकीचे नुकसान झाले आहे. या घटना पाहता रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी केली जात आहे.

 

टॅग्स :Accidentअपघातkdmcकल्याण डोंबिवली महापालिकाkalyanकल्याणhospitalहॉस्पिटल