शहरं
Join us  
Trending Stories
1
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
2
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
5
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
6
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
7
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
9
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
10
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
11
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
12
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
13
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
14
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
15
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
16
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
17
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
18
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
19
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
20
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसीमध्ये काँग्रेसला धक्का?

By admin | Updated: October 3, 2015 03:18 IST

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बहुतांशी नगरसेवकांना गळाला लावण्यात शिवसेना-भाजपा यशस्वी झाले असतानाच आता काँग्रेसला पुन्हा धक्का देण्यासाठी डोंबिवली भाजपाने

डोंबिवली : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बहुतांशी नगरसेवकांना गळाला लावण्यात शिवसेना-भाजपा यशस्वी झाले असतानाच आता काँग्रेसला पुन्हा धक्का देण्यासाठी डोंबिवली भाजपाने कंबर कसली आहे. गेली अनेक वर्षे महापालिकेतील काँग्रेसचा डोंबिवलीतील बालेकिल्ला असलेल्या इंदिरानगर परिसरात साम्राज्य असलेल्या शिवाजी शेलार यांचा भाजपात प्रवेश होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तो होणार आहे. काँग्रेसला हा जबर धक्का असून निदान डोंबिवलीत तरी त्या पक्षाचे अस्तित्व खालसा होण्याची चिन्हे आहेत. शहरात सध्या पक्षाचे सहा नगरसेवक असून पश्चिमेकडे तीन तर पूर्वेकडे तिघांचा समावेश आहे. रवी पाटील यांनी या आधीच शिवसेनेत प्रवेश केल्यानेही त्या पक्षाची हानी झाली होती. स्वीकृत नगरसेवक नवीन सिंग हे अद्याप तरी पक्षातच आहेत, तर अन्य एका नगरसेवकाने पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. पक्षाचे महापालिका प्रवक्ते संतोष केणे यांच्या कुटुंबीयांपैकीही सदस्य भाजपात जाणार असल्याचीही जोरदार चर्चा होती. पण, त्यांनी या चर्चेत दम नसल्याचे ‘लोकमत’ला स्पष्ट केले. शेलार यांच्या जाण्याने काँग्रेसच्या दोन जागा कमी होतील, तर भाजपाच्या तीन जागा वाढतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. यासंदर्भात शेलार यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.