शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

करमुसे मारहाण प्रकरण: सीबीआयच्या धास्तीपोटी Jitendra Awhad यांचे अटकनाट्य? न्यायालयात याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2021 09:42 IST

Jitendra Awhad News: अभियंता अनंत करमुसे मारहाण प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) जाण्याच्या शक्यतेनेच गुरुवारी राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांचे अटकनाट्य झाल्याची चर्चा पोलीस आणि राजकीय वर्तुळात रंगली आहे.

- जितेंद्र कालेकरठाणे : अभियंता अनंत करमुसे मारहाण प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) जाण्याच्या शक्यतेनेच गुरुवारी राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांचे अटकनाट्य झाल्याची चर्चा पोलीस आणि राजकीय वर्तुळात रंगली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आव्हाड यांना आरोपी करावे आणि हा तपास सीबीआयकडे सोपवावा, अशी मागणी करमुसे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेद्वारे रेटून धरली होती.

सोशल मीडियावर आव्हाड यांच्यासंदर्भातील आक्षेपार्ह पोस्ट करमुसे यांनी  व्हायरल केल्याचा आरोप होता. या प्रकरणामुळे त्यांच्या काही पोलीस अंगरक्षकांसह खासगी कार्यकर्त्यांनी  करमुसे यांना आव्हाड यांच्या ‘नाद’ बंगल्यावर नेले होते. तिथे आव्हाड यांच्यासमोरच त्यांना फायबरच्या काठीसह लोखंडी रॉडने जबर मारहाण केली होती. ५ एप्रिल रोजी रात्री ११.५०  ते ६ एप्रिल २०२०  रोजी सकाळी ६.२२ वाजेच्या दरम्यान हा प्रकार घडला होता. याप्रकरणी ६ एप्रिल रोजी वर्तकनगर पेालीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. यामध्ये मुंबई सुरक्षा दलातील हवालदार वैभव कदम, सुरेश जनाठे तसेच  ठाणे मुख्यालयातील पोलीस शिपाई सागर मोरे हे तीन पोलीस कर्मचारी तसेच अभिजित पवार, समीर पवार, हेमंत वाणी, सूरज यादव, ज्ञानोबा वाघमारे, दिलीप यादव या  खासगी कार्यकर्त्यांसह १२ जणांना अटक झाली होती. ठाणे पोलिसांनी मात्र यात १२ आरोपी अटक केल्याचे तसेच तपास नि:पक्षपणे होत असल्याचा दावा सुनावणीच्या वेळी केला. आता तपास सीबीआयकडे गेलाच तर केंद्रीय यंत्रणेकडून अटकेची नामुष्की  ओढवू शकली असती. जरी हा तपास सीबीआयकडे गेला तरी एका गुन्ह्यात एकदाच अटक होते. या सर्व बाबी विचारात घेऊन आव्हाड स्वत: वर्तकनगर पेालीस ठाण्यात गुरुवारी दुपारी हजर झाल्याचे बोलले जात आहे.दरम्यान, १८ महिन्यांनी यात आव्हाड यांना आरोपी करून त्यांना गुरुवारी अटक केली. तरीही सीबीआयकडे हा तपास वर्ग करावा, या मागणीवर आपण ठाम असल्याचे  करमुसे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. 

‘गृहनिर्माणमंत्र्यांना निलंबित करा’- अनंत करमुसे मारहाण प्रकरणात तीन पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. मात्र गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे राज्यपालांकडे आव्हाड यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करणार असल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी दिली. -गुरुवारी घडलेल्या आव्हाड यांच्या अटक आणि जामीन प्रकरणानंतर शुक्रवारी सोमय्या यांनी करमुसे यांची भेट घेतली. ठाकरे सरकार हे माफियांचे सरकार असल्याची टीका त्यांनी केली. आपल्यावरील हल्ल्याची सीबीआयमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी यावेळी अनंत करमुसे यांनी केली. या प्रकरणात मागील वर्षी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यात एक वर्षानंतर अटक आणि तत्काळ सुटका होते, हे अतिशय दुर्दैवी असल्याचेही करमुसे म्हणाले.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडthaneठाणे