शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण डोंबिवलीत युती तुटली ?

By admin | Updated: October 13, 2015 10:12 IST

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेना - भाजपाची युती दुभंगली असून दोन्ही पक्षांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑनलाइन लोकमत

ठाणे, दि. १३ - कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेना - भाजपाची युती दुभंगली असून दोन्ही पक्षांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असून शिवसेना सर्व १२२ जागांवर उमेदवार उभे करण्याची शक्यता असून भाजपा आणि रिपाइंची युती होण्याची चिन्हे आहेत. 

कल्याण डोंबिवली महापालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना - भाजपाची युती असून विधानसभा निवडणुकीनंतर मात्र शहरातील चित्र बदलले आहे. डोंबिवली व कल्याण पश्चिमेत भाजपाचा आमदार असून कल्याण पूर्वेतील आमदार गणपत गायकवाड हेदेखील भाजपाच्या गोटात दाखल झाले आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीत बाजी मारण्याचे स्वप्न भाजपाच्या स्थानिक नेत्यांना पडू लागली आहेत. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे डोंबिवलीतील विकास परिषदेत सहभागी झाले होते व या परिषदेत त्यांनी शहरासाठी पॅकेजचीही घोषणा केला होती. 

युतीसाठी दोन्ही पक्षाचे नेते अनुत्सुक होते. भाजपानेही यंदा जास्त जागा मागितल्याने शिवसेना नेत्यांची यासाठी तयारी नव्हती. अखेरीस सोमवारी रात्री दोन्ही पक्षांनी निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांकडून समजते.  गेल्या काही दिवसांपासून शिवसेना - भाजपा युतीतील संबंध कमालीचे ताणले असून मुंबईत विविध प्रकल्पांच्या भूमिपूजनासाठी नरेंद्र मोदी मुंबईत असताना या कार्यक्रमाकडे शिवसेनेने पाठ फिरवली होती. उद्धव ठाकरेंना उशीराने निमंत्रण दिल्याने शिवसेनेत नाराजी होती. तसेच खुर्शिद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या मुद्द्यावरुनही शिवसेना व भाजपा आमनेसामने उभे ठाकले होते.