शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात चोरी करून पसार झालेल्या चोरट्याला झारखंडमधून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 22:20 IST

ठाण्यातील हिरानंदानी मेडोज या उच्चभ्रू वसाहतीमधील निवृत्त आयकर अधिकाऱ्याच्या घरातच तब्बल ३९ लाखांच्या ऐवजाची चोरी करुन पसार झालेल्या हिरालाल गोराइन या नोकराला चितळसर पोलिसांनी थेट झारखंड येथून अटक केली आहे. त्याच्याकडून २९ लाखांचा ऐवजही हस्तगत करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे२९ लाखांचा ऐवज हस्तगततीन दिवसांमध्ये लावला छडाचितळसर पोलिसांची कारवाई

ठाणे : हिरानंदानी मेडोज सोसायटीतील एका घरातील हिरालाल गोराइन या नोकराने त्याच घरात ३९ लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी करून पलायन केले होते. त्याला दागिन्यांसह अवघ्या तीन दिवसांमध्ये झारखंड राज्यातून चितळसर पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्याच्याकडून १० हजारांच्या रोकडसह २९ लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.ठाण्यातील हिरानंदानी मेडोज सोसायटीच्या २१ व्या मजल्यावर राहणारे निवृत्त आयकर अधिकारी राधारमन त्रिपाठी यांच्या घरात ते गावी गेल्यानंतर १ नोव्हेंबर २०१९ रोजी सोने, चांदी आणि इतर ऐवजासह ३९ लाखांची चोरी झाली होती. त्रिपाठी हे १५ नोव्हेंबर रोजी गावाहून परतल्यानंतर चोरीचा हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली. गेल्या चार वर्षांपासून त्यांच्या घरात विविध कामांसह चालकाचेही काम करणारा नोकर हिरालाल याच्यावर त्यांनी या चोरीबाबत संशय व्यक्त केला होता. या घटनेची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड यांनी सहायक पोलीस निरीक्षक शशिकांत रोकडे, पोलीस हवालदार रंगराव पाटील आणि पोलीस नाईक सतीश सुर्वे यांचे एक पथक तयार केले. हिरालाल हा झारखंड राज्यातील बोकारो या गावी पळाल्याची माहिती समोर आल्यानंतर रोकडे यांचे पथक थेट बोकारो येथे पोहोचले. चितळसर पोलिसांनी झारखंड राज्यातील स्थानिक पोलीस, गावकरी यांच्या मदतीने १८ नोव्हेंबर रोजी हिरालालचे घर शोधून काढले. मात्र, तो त्यावेळी तिथे आढळला नाही. झारखंड भागात विधानसभेच्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू असल्यामुळे त्या भागात संवेदनशील वातावरण होते. अशा वातावरणामध्ये स्थानिक नागरिकांना विश्वासात घेत कोणत्याही प्रकारे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ न देता हिरालाल याला या पथकाने मोठ्या शिताफीने अटक केली. त्याच्या ताब्यातून सुमारे २९ लाखांचा ऐवजही हस्तगत केला. यामध्ये हिऱ्यांच्या आणि सोन्याच्या दागिन्यांचा समावेश असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड यांनी सांगितले. हिरालाल याला २१ नोव्हेंबर रोजी ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला २६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी