उल्हासनगरात मुलीसोबत बोलण्यास मनाई करताच, तरुणाचा तलवार नाचवत धिंगाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 18:16 IST2026-04-27T18:16:13+5:302026-04-27T18:16:52+5:30

मारहाणीत दोघी जखमी झाले आहे.

In Ulhasnagar, a young man dances with a sword and makes a noise after being forbidden to talk to a girl | उल्हासनगरात मुलीसोबत बोलण्यास मनाई करताच, तरुणाचा तलवार नाचवत धिंगाणा

उल्हासनगरात मुलीसोबत बोलण्यास मनाई करताच, तरुणाचा तलवार नाचवत धिंगाणा

उल्हासनगर: मुलीच्या आईने मुलीसोबत बोलण्यास मनाई केल्याच्या रागातून तरुणाने तलवार नाचवत मुलीच्या घरात धिंगाणा घालत मारहाण केली. तसेच जीवेठार मारण्याची धमकी दिल्याने, मुलीची आई घाबरली असून याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

उल्हासनगर कॅम्प नं-३, आस्था हॉस्पिटल परिसरात नितु विरुसिंग लबाना ह्या कुटुंबासह राहतात. त्याच भागात विष्णु परिहार नावाचा तरुण राहतो. त्याला मुलीसोबत बोलण्यास नितु लबाना यांनी मनाई केली. या रागातून विष्णू परिहार यांने रविवारी २६ एप्रिल रोजी दुपारी अडडीच वाजता लबाना यांच्या घरात जबरदस्तीने तलवार घेवून घुसून मुलींस व त्यांची जेठानी ज्योती यांना शिवीगाळ मारहाण केली.

मारहाणीत दोघी जखमी झाले आहे. तसेच तुम लोगो को अब जिंदा छोड़ रहा हूँ, लेकीन मै फिरसे आऊंगा अशी आरडाओरड करीत हातातील तलवार हवेत फिरवून धमकी देत निघून गेला. जाताना त्यांने दुचाकीची तोडफोड करुन नुकसान केले. या प्रकाराने भयभीत झालेल्या नितु लबाना यांच्या तक्रारीवरून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात विष्णू परिहार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचे स्वरूप बघता पोलीस त्याचा कसून तपास करीत आहेत.

Web Title : उल्हासनगर: लड़की से बात करने से मना करने पर युवक ने तलवार लहराई।

Web Summary : उल्हासनगर में एक लड़की से बात करने से मना करने पर एक युवक ने तलवार लहराई, उसके घर में तोड़फोड़ की और उसके परिवार को धमकी दी। पुलिस ने मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है।

Web Title : Ulhasnagar: Youth brandishes sword after being told to not talk to girl.

Web Summary : An Ulhasnagar youth, enraged at being told to stop talking to a girl, brandished a sword, vandalized her house, and threatened her family. Police have registered a case and are investigating.