शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
9
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
10
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
11
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
12
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
13
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
14
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
15
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
16
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
17
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
18
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
19
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
20
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा

बदलापुरात भावजीने केली मेहुणीची हत्या, सासूलाही बेदम मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2022 10:20 IST

पत्नी, सासूलाही केली बेदम मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्कबदलापूर : मालमत्तेच्या वादातून झालेले पती-पत्नीचे भांडण सोडवण्यासाठी आलेल्या मेहुणीची भावजीने हत्या केल्याची घटना बदलापूरमध्ये सोमवारी घडली. यात आरोपीने पत्नी आणि सासूवरही हल्ला करून त्यांना जखमी केले. बदलापूर पश्चिम पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

बदलापूर गावातील सनसेट हाईट इमारतीत फरिदा सय्यद या त्यांच्या दोन मुली निलोफर आणि सनोबर, तसेच नातवंडांसोबत राहतात. त्यांची मुलगी निलोफर ही विवाहित असून पतीसोबत वाद सुरू असल्याने ती आईकडेच वास्तव्याला आहे. सोमवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास निलोफरचा पती मोहम्मद आयुब शेख हा सासूच्या घरी राहणाऱ्या आपल्या पत्नीला भेटायला आला. मात्र दरवाजा उघडताच त्याने सोबत आणलेल्या धारदार शस्त्राने निलोफरवर हल्ला चढवला. या हल्ल्यात निलोफर गंभीर जखमी झाली. हे पाहून त्याची मेहुणी सनोबर आणि तिची आई फरिदा या दोघी  निलोफरला वाचवायला मध्ये पडल्या. मात्र मोहम्मदने त्या दोघींवरही हल्ला चढवला. यामध्ये सनोबरचा जागीच मृत्यू झाला, तर फरिदा सय्यद जखमी झाल्या. यावेळी स्थानिकांनी मोहम्मद आयुब शेख याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या हल्ल्यात जखमी झालेल्या निलोफर आणि फरिदा सय्यद यांच्यावर बदलापूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

मालमत्तेवरून होता दोघांमध्ये वादमोहम्मद शेख हा दुबईला कामाला होता. पत्नी निलोफर सोबत त्याचे पटत नसल्यामुळे ते दोघे वेगळे राहत होते. मात्र जोगेश्वरीच्या प्रॉपर्टीवरून या दोघांमध्ये वाद होते. याच वादातून ही हत्या झाल्याची माहिती बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता गावडे यांनी दिली. आरोपी मोहम्मद आयुब शेख याला पोलिसांनी अटक केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसbadlapurबदलापूर