शहरं
Join us  
Trending Stories
1
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
2
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
3
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
4
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
5
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
6
कान्समध्ये अवतरली जणू स्वप्नातील परी! मिंट-ग्रीन गाऊनमध्ये आलिया भट्टचा 'प्रिन्सेस लूक' व्हायरल
7
Vastu Shastra: घरात पैसे टिकत नाहीत? मग चुकूनही 'या' दिशेला ठेवू नका तुमची तिजोरी!
8
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
9
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
10
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
11
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
12
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
13
अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश; प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
14
देश प्रथम! PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; मंत्री शंभूराज देसाईंचा लंडन-पॅरिस दौरा रद्द
15
भाजप नेत्यांनी ५० गाड्यांच्या ताफ्यासह भोपाळला काढली रॅली, PM मोदींचं आवाहन नेते दुसऱ्याच दिवशी विसरले!
16
'या' Infra कंपन्यांची लागली लॉटरी! ११ हजार कोटींचा प्रोजेक्ट मिळताच स्टॉक सुस्साट, हाती आला रेल्वे-हायवेचा प्रोजेक्ट
17
Mumbai Crime: ब्युटीशियन मनाली यांची अंबोलीत हत्या; अवघ्या दोन तासांत मित्रास घाटकोपरमध्ये केले अटक
18
संध्याकाळपर्यंत कुणी ओळखत नव्हता, एका रात्रीत बनला हीरो, कोण आहे माधव तिवारी?  
19
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य सेवा कागदावरच

By admin | Updated: June 24, 2016 03:37 IST

बदलापूर शहरवासियांना चांगली आरोग्य सेवा मिळावी यासाठी दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांसह २९ पदे मंजूर करण्यात आली. मात्र ही पदे अद्याप पदे भरण्यात आलेली नाही

बदलापूर : बदलापूर शहरवासियांना चांगली आरोग्य सेवा मिळावी यासाठी दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांसह २९ पदे मंजूर करण्यात आली. मात्र ही पदे अद्याप पदे भरण्यात आलेली नाही. त्यामुळे बदलापूरची आरोग्य सेवा ही कागदावरच राहिली आहे.
राष्ट्रीय शहरी आरोग्य योजनेअंतर्गत राज्य सरकारने बदलापूर नगरपालिकेसाठी दोन पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, दोन मुख्य परिचारिका, १८ सहायक परिचारिका, एक प्रयोगशाळा तज्ज्ञ, एक औषध निर्माता, दोन डेटा एंट्री आॅपरेटर कम अकाऊंटंट व दोन शिपाई अशी २९ पदे मंजूर केली आहेत. ही पदे कंत्राटी पद्धतीने भरली जाणार असून जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या माध्यामतून भरती प्रक्रि या पूर्ण करण्यात येणार आहे. नगरपालिकेचे मुख्याधिकारी या समितीचे सदस्य सचिव आहेत. त्याशिवाय जिल्हा शल्य चिकित्सक, नगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी या समितीचे सदस्य असून युनिसेफ व यूएनएफपीएचे प्रत्येकी एक प्रतिनिधीही या समितीवर आहे. दोन वर्षापूर्वी राज्य सरकारकडून मंजुरी मिळालेली ही पदे भरण्यात यावीत असा ठराव नगरपालिकेने जून २०१५ मध्ये मंजूर करु न जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवला आहे. त्यावर अद्याप कार्यवाही झालेली नाही. याबाबत पाठपुरावा करण्यात नगरपालिका प्रशासन अपयशी ठरले असल्याचा आरोप भाजपा शहर अध्यक्ष संभाजी शिंदे यांनी केला आहे.
नगरपालिकेच्या दुबे रूग्णालयात सध्या फक्त बाह्य रु ग्ण तपासणी सुरु असून एका वैद्यकीय अधिकाऱ्यांसह १९ कर्मचारी तीन लाखाच्या घरात लोकसंख्या असलेल्या शहराला आरोग्य सेवा देत आहेत. दररोज सुमारे २५० ते ३०० रु ग्ण येथे उपचारासाठी येतात. त्यामुळे स्वाभाविकच ही रु ग्णसेवा देताना या कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण येतो.
राज्य सरकारने दोन वर्षापूर्वी बदलापूर नगरपालिकेसाठी मंजूर केलेली २९ पदे भरली गेली असती तर हे चित्र बदलले असते. नागरिकांना चांगली आरोग्य सेवा मिळावी यासाठी नगरपालिकेची रु ग्णसेवा समितीही आहे. या समितीची दर तीन महिन्यांनी बैठक होणे आवश्यक आहे. जुलै २०१५ मध्ये या समितीची पहिली बैठक झाली होती. त्यामधे
रु ग्णालय कर्मचारी भरती संदर्भात तातडीने कार्यवाही करण्यासाठी पाठपुरावा करणे, रूग्णालयात नूतनीकरण करून चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे याबाबत निर्णय घेण्यात आला होता. त्याशिवाय सरकारी आदेशानुसार लोकसंख्येच्या निकषानुसार शहरात चार प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्याबाबतही निर्णय झाला होता. परंतु नंतर समितीची बैठकच झालेली नाही. त्यावरून नागरिकांच्या आरोग्याच्या बाबतीत प्रशासन बेफिकीर असल्याचा आरोपही शिंदे यांनी केला आहे.