शहरं
Join us  
Trending Stories
1
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
2
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
3
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
4
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
6
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
7
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
8
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
9
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
10
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
11
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
12
Latest Marathi News LIVE Updates: महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा
13
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
14
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
15
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
16
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
17
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
18
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
19
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
20
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

असा घडला बदलापूरचा टीडीआर घोटाळा

By admin | Updated: August 21, 2015 02:20 IST

अस्तित्वात असलेला कायदा, नियम तरतुदींची कोणतीही अंमलबजावणी न करता, टीडीआर नियमानुसार जमिन मालकाला कोणतेही विकास काम न देता बदलापूर पालिकेत टीडीआर घोटाळा

बदलापूर : अस्तित्वात असलेला कायदा, नियम तरतुदींची कोणतीही अंमलबजावणी न करता, टीडीआर नियमानुसार जमिन मालकाला कोणतेही विकास काम न देता बदलापूर पालिकेत टीडीआर घोटाळा घडविण्यात आला. नगरपालिकेची आरक्षणे विकसित करण्यासाठी दुसऱ्याच कुठल्यातरी कंपनीच्या साध्या लेटरहेडवर पत्र घेण्यात आले. ही आरक्षणे विकसित करणाऱ्या कंपन्या, सार्वजनिक बांधकाम विभागात नोेंदणीकृत आहेत किंवा नाहीत या कंपन्या इन्कम टॅक्स सर्व्हिस टॅक्स व शॉप अ‍ॅक्ट अशा कोणत्याही स्वरुपात नोंदणीकृत असल्याचे दर्शविणारी कोणतीही कागदपत्रे घेण्यात आली नाहीत. असे असतांनाही संबंधित कंपन्यांना कोणते आराखडे, तांत्रिक मान्यता असलेले अंदाजपत्रक तयार न करता आणि प्रशासकीय मान्यता न घेता काम करण्याचे कार्यादेश तत्कालिन मुख्याधिकारी भालचंद्र गोसावी यांनी दिले होते. ही कामे करतांना कोणत्या आराखड्या प्रमाणे आणि अंदाज पत्रकाप्रमाणे काम केले? कोणत्या अभियंत्याने कामावर देखरेख केली? केलेल्या कामांची गुणवत्ता कोणी तपासली? केलेल्या कामाचे मोजमाप मोजणी पुस्तकात नोंद न करता काम पूर्ण झाल्याचा दाखला कोणत्या अभियंत्याने दिला असे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. या प्रकरणी आमदार किसन कथोरे यांनी सतत तक्रारी आणि पाठपुरावा करून विधानभवनातही प्रश्नही उपस्थित केले होते. त्यानंतर शासना मार्फत नेमलेल्या सहाय्यक संचालक नगररचना ठाणे यांच्याकडून चौकशी अहवाल मागवला होता. त्यात अशा ५५ प्रकरणी नियमबाह्य काम केल्याचा सुस्पष्ट अहवाल जितेंद्र ओकळे यांनी दिला होता. शासनाकडे सादर झालेल्या या अहवालावर कोणतीही कारवाई होत नसल्याने माहिती अधिकार कार्यकर्ते विनायक जाधव यांनी जनहित याचिका दाखल केली होती. नगरविकास विभागाने संबंधित प्रकरणी कठोर पावले उचलत गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. अखेर गुरूवारी या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.