शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

आशांसह गटप्रवर्तकांचा सोमवारपासून तीन दिवस संप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 00:26 IST

ना मास्क, ना छापील फॉर्म : कसे करणार कोरोना सर्वेक्षणाचे काम

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेसाठी आरोग्य पथके तयार केली आहेत. परंतु, बहुतांश ठिकाणी लोकप्रतिनिधींकडून अपेक्षित असलेला दोनपैकी एकही स्वयंसेवक मिळालेला नाही. उलटपक्षी, आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांनाच त्यांच्या घरातील व्यक्तींना आणण्याची सक्ती केली जात आहे. या सक्तीच्या विरोधासह प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील आशा व गटप्रवर्तक २८ सप्टेंबरपासून संपात उतरत आहे, असे महाराष्ट्र राज्य आशा-गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीचे नेते अ‍ॅड. एम.ए. पाटील यांनी सांगितले.

आहे त्या स्वयंसेविकांकडे अ‍ॅन्ड्रॉइड फोन नसल्यामुळे केलेल्या कामाचे रेकॉर्ड त्या ठेवू शकत नाहीत. ज्या ठिकाणी मोबाइल रेंज जात नाही, त्या ठिकाणी मोहिमेसाठी छापील फॉर्म पुरविण्याची सूचना केली आहे.परंतु, असे कोणतेही फॉर्म पुरवलेले नाहीत. कोठेही टी-शर्ट, कॅप, बॅज, हॅण्ड ग्लोव्हज मास्क, सॅनिटायझर देण्यात आलेले नाहीत, स्टिकर्स व मार्कर पेन कोठेही देण्यात आलेले नाहीत.मोहीम कार्यान्वित करून सहा दिवस झाले, तरी या योजनेची अंमलबजावणी कार्यान्वित झालेली नाही. आशा स्वयंसेविकांना प्रत्येकी दोन स्वयंसेवक न पुरविल्यामुळे त्या एकट्या या मोहिमेचे काम करू शकत नाहीत. या गंभीर बाबींकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधून महाराष्ट्र राज्य आशा-गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीने राज्यस्तरीय तीनदिवसीय संपाचा इशारा दिल्याचे पाटील यांनी सांगितले.या आहेत आमच्या विविध मागण्याया मोहिमेसाठी गटप्रवर्तकांना प्रतिदिन २५ रुपयांप्रमाणे मासिक ६२५ रु. दैनिक भत्ता पूर्ववत देण्यात यावा व त्यात भरीव वाढ करण्याचा प्रस्ताव मंजूर करावा. अधिसूचनेनुसार आशा प्रतिमहा दोन हजार रुपयांनी व गटप्रवर्तकाचे ठरावीक वेतन प्रतिमहा तीन रुपयांनी वाढवण्यात आलेले आहे. त्याची अंमलबजावणी १ आॅक्टोबर २०१९ पासून करावी. मुख्यमंत्र्यांनी २०१९ मध्ये सर्व आशा स्वयंसेविकांना सायकली देण्याची घोषणा केली होती. आता तरी या घोषणेची अंमलबजावणी करण्यात यावी आदी मागण्यांसाठी आशा व गटप्रवर्तक यांनी संपाचे हत्यार उपसले आहे.