शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

जिल्ह्यात ९५ हजार रेशनकार्डधारकांचा धान्यपुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 4:56 AM

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणो : जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागामधील ज्या शिधापत्रिकाधारकांनी सहा महिन्यांपासून रेशनिंग दुकानांतून त्यांच्या धान्याचा लाभ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणो : जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागामधील ज्या शिधापत्रिकाधारकांनी सहा महिन्यांपासून रेशनिंग दुकानांतून त्यांच्या धान्याचा लाभ घेतला नाही, अशा एक लाख नऊ हजार ९०५ कार्डधारकांपैकी तब्बल ९४ हजार ९०७ कार्डधारकांचा अन्नधान्यपुरवठा आता कायमचा बंद केला आहे. त्यांच्या या अन्नधान्याचा लाभ कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये नोकरीस मुकलेल्या गरजू कुटुंबीयांना वाटप करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

‘जिल्ह्यात दीड लाख शिधापत्रिका बंद करण्याच्या हालचाली’ या मथळ्याखाली लोकमतने १८ नोव्हेबर रोजी वृत्तप्रसिद्ध करून प्रशासनाच्या हालचाली उघड केल्या होत्या. यात अंत्योदय व प्राधान्य कुटुंबांच्या जागी गरजू कुटुंबीयांच्या नावांचा समावेश करून त्याना या अन्नधान्याचा लाभ दिला जाणार आहे. सहा महिन्यांत एकदाही त्यांनी अन्नधान्य खरेदी केलेले नाही, अशा शिधापत्रिकाधारकांचे आता अन्नधान्य बंद केले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सुमारे एक लाख ४८ हजार कार्डधारकांपैकी बहुतांशी सधन कुटुंबांकडून स्वस्त धान्य खरेदी केले जात नाही, तर शहरी भागातील प्राधान्य कुटुंब यादीतील सात लाख ४४ हजार ४७७ कार्डधारकांपैकी पाच लाख १६ हजार ७७५ कार्डधारक दरमहा अन्नधान्य खरेदी करत असल्याचे दिसत आहे.

* १५ हजार कार्डधारकांवरही लवकरच बडगा

जिल्ह्यातील या साडेसात लाख कडधारकांपैकी अंत्योदय योजनेचे शहरी भागात १३ हजार १३० लाभार्थी आहेत. त्यापैकी ११ हजार ६२६ लाभार्थी आहेत. शिधावाटप विभागाच्या ‘फ’ परिमंडळ विभागाने कारवाई करून आजपर्यंत ९४ हजार ९०७ कार्डधारकांवर ‘एनईआर’ कारवाई केली आहे. सहा महिन्यांपासून अन्नधान्याची उचल न केलेल्या या कार्डधारकांपैकी ८६.३५ टक्के कुटुंबीयांवर कारवाई झाली आहे. उर्वरित १४ हजार ९९८ या ३५ टक्के कार्डधारकांवर ही कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे.

----------------