शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वाड्यातील भातखरेदी केंद्रांना लागली शासकीय ‘उदासीनतेची घूस’

By admin | Updated: February 1, 2016 01:10 IST

तालुक्यात सुरू असलेल्या भातखरेदी केंद्रांना महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास मंडळाच्या उदासिन कारभाराची घूस लागल्याने भातखरेदीचा पुरता बोजवारा उडाला

वसंत भोईर,  वाडातालुक्यात सुरू असलेल्या भातखरेदी केंद्रांना महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास मंडळाच्या उदासिन कारभाराची घूस लागल्याने भातखरेदीचा पुरता बोजवारा उडाला असून शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.महाराष्ट्राच्या सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्यामार्फत भातखरेदी केंद्र वाडा तालुक्यात खानिवली, गोऱ्हे, परळी, पोशेरी, तिळगाव, खैरे-आंबिवली या ठिकाणी सुरू करण्यात आली. परंतु या केंद्रावर भात भरण्यासाठी लागणारे पोतीच उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना अनेक दिवस हेलपाटे मारूनही भातविक्री करता येत नाही. त्याच प्रमाणे या केंद्रावरील कर्मचारी शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन अपमानित करत असल्याच्या अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. केंद्रावर भात घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना भाताची प्रतवारी ठरवितांना नुकसान सोसावे लागत असल्याचे अनेक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. वाडा तालुका हा भौगोलिक दृष्ट्या मोठा असून या तालुक्यात भात पिकाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. तालुक्याला भाताचे कोठार म्हणून संबोधले जाते. येथे भात पिकाचे क्षेत्रही अन्य तालुक्यांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे तालुक्यात जास्तीत जास्त भातखरेदी केंद्र उघडणे अपेक्षित असताना मोजकीच केंद्र उघडल्याने शेतकऱ्यांची गर्दी या केंद्रावर वाढली आहे. त्यामुळे या केंद्राच्या भात साठवणुकीच्या गोडवूनची क्षमता मर्यादित असल्याने अनेक शेतकरी भातविक्री पासून वंचित रहात आहेत.तालुक्यातील महसूली गावांची संख्या १५० हून अधिक असताना केवळ सात भातखरेदी केंद्र सुरू केल्याने या केंद्रावर भात घेऊन जाण्यासाठी शेतकऱ्यांना २० ते २५ किमी अंतराचा प्रवास करून जावे लागत असल्याने शिवाय अधिकचे पैसे मोजावे लागत असल्याने आधीच न परवडणाऱ्या शेतीत बुडत्याचा पाय खोलात अशी स्थिती शेतकऱ्याची आहे. अशा या उदासिन धोरणामुळे वाडा तालुक्यातील शेतकऱ्यांना हमी भावापासून वंचित राहावे लागत आहे. तालुक्यातील देवघर येथील प्रगतीशिल शेतकरी प्रफुल्ल पाटील यांच्याशी संपर्क साधला असता तालुक्यातील भातखरेदी केंद्रांची संख्या कमी असून भातखरेदी करण्याचे प्रमाण अल्प आहे. शिवाय शेतकऱ्यांना वारंवार हेलपाटे मारूनही पोती मिळत नसल्याची तक्रार त्यांनी केली. तर खानिवली भातखरेदी केंद्राचे केंद्रप्रमुख भास्कर जाधव यांच्याशी संपर्क साधला असताना ७०० क्विटंल भातखरेदी केल्याचे सांगून अधिकाधिक भाताची खरेदी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.