शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

गोविंदवाडी बायपास आठवडाभरात खुला

By admin | Updated: December 27, 2016 02:52 IST

शहरातील वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी तयार केलेल्या कल्याण पत्रीपूल ते दुर्गाडी या एक किलोमीटरच्या गोविंदवाडी बायपास रस्त्याची एक बाजू आठवडाभरात

कल्याण : शहरातील वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी तयार केलेल्या कल्याण पत्रीपूल ते दुर्गाडी या एक किलोमीटरच्या गोविंदवाडी बायपास रस्त्याची एक बाजू आठवडाभरात तर दुसरी बाजू महिनाभरात खुली केली जाईल, अशी घोषणा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी केली. कल्याणमध्ये उभारण्यात येत असलेले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक, गोविंदवाडी बायपास रस्त्याची शिंदे यांनी सोमवारी पाहणी केली. त्याचबरोबर डोंबिवलीतील घरडा सर्कल येथील कॅप्टन विनयकुमार सच्चान स्मारकाजवळ केडीएमसीच्या १८ घंटागाड्यांचेही लोकार्पण केले. या वेळी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह महापौर राजेंद्र देवळेकर, सभागृह नेते राजेश मोरे, गटनेते रमेश जाधव, शहर प्रमुख विश्वनाथ भोईर, नगरसेवक दीपेश म्हात्रे, मल्लेश शेट्टी, माजी नगरसेवक सचिन बासरे आदी मान्यवर उपस्थित होते. एमएसआरडीसीने २०११ पासून एमएमआरडीएच्या निधीतून गोविंदवाडी बायपास तयार केला. त्याचे दुर्गाडीकडील एक टोक तबेल्याच्या पुनर्वसनामुळे रखडले होते. हा वाद न्यायप्रविष्ट होता. तबेलेवाल्याचे पुनर्वसन पालिकेने केल्याने रस्त्याच्या मार्ग मोकळा झाला आहे. त्यासाठी मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते शरफुद्दीन कर्ते व स्थानिक नगरसेवक काशीब तानकी यांनी सहकार्य केले. तेव्हा रस्ता सुरु करण्यात कोणतीही अडसर येणार नाही, अशी ग्वाही २०१५ च्या महापालिका निवडणुकीच्या आधी शिंदे यांनी दिली होती. सोमवारी या रस्त्याची पाहणी करून एक बाजू आठवडाभरात, तर दुसरी महिनाभरात खुली करण्याची घोषणा केली. त्यामुळे कल्याणमधील वाहतूक कोंडी फुटण्यास मदत होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी) बाळासाहेबांचे स्मारक १० जानेवारीपर्यंत पूर्णकल्याण पश्चिमेला काळा तलाव येथे १० कोटी खर्चून उभारण्यात येत असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे काम १० जानेवारीपर्यंत पूर्ण करण्यात येईल, अशी माहितीही शिंदे यांनी दिली. ठाकरे यांचा पुतळा कोल्हापुरात तयार करण्यात आला आहे. स्मारकाच्या ठिकाणी भव्य कमान, तसेच आर्ट गॅलरी उभारली आहे. तेथे बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनपट उलगडण्यात येईल. या स्मारकाचे उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मुंबई, ठाणे महापालिकेच्या हद्दीतही स्मारक उभारण्यात येणार आहे. मात्र या दोन्ही महापालिकांच्या आधी नव्हे, तर देशातील पहिले स्मारक पूर्ण करण्याचा मान कल्याण-डोंबिवली महापालिकेला मिळणार आहे. बाळासाहेबांचे बालपण काळा तलाव परिसरात गेले असल्याने महापालिकेने काळा तलावाचे सुशोभिकरण केले. या तलावाच्या विकासाचे त्यांचे स्वप्न होते. ते स्वप्नही शिवसेनेने पूर्ण केले.