शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत चार नवीन पोलीस ठाण्यांचे शासनाचे प्रस्ताव

By admin | Updated: September 14, 2015 23:14 IST

भिवंडी पोलीस उपायुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील शहर आणि ग्रामीण भागात झपाट्याने होणारा विकास आणि वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने भिवंडीत वंजारपाटीनाका, मानसरोवर, कारिवली

- पंढरीनाथ कुंभार,  भिवंडीभिवंडी पोलीस उपायुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील शहर आणि ग्रामीण भागात झपाट्याने होणारा विकास आणि वाढत्या लोकसंख्येच्या अनुषंगाने भिवंडीत वंजारपाटीनाका, मानसरोवर, कारिवली व दापोडे या चार नवीन पोलीस ठाण्यांचे प्रस्ताव शासनाकडे संबंधित विभागामार्फत पाठविले असून ते शासनाच्या विचाराधीन आहेत.पोलीस उपायुक्तालयांतर्गत सध्या शहर व ग्रामीणमध्ये शहर पोलीस ठाणे, निजामपूर पोलीस ठाणे, भोईवाडा पोलीस ठाणे, नारपोली पोलीस ठाणे, शांतीनगर पोलीस ठाणे व कोनगाव पोलीस ठाणे अशी सहा पोलीस ठाणी आहेत. या सर्व पोलीस ठाण्यांना ग्रामीण भागही जोडला असल्याने त्यांची पुनर्रचना करणे, ही काळाची गरज बनली आहे.म्हणून शांतीनगर व निजामपूर पोलीस ठाण्यांची हद्द कमी करून वंजारपाटीनाका पोलीस ठाणे बनविण्याचे प्रस्तावित आहे.शहर व नारपोली पोलीस ठाण्यांची हद्द कमी करून मानसरोवर पोलीस ठाणे प्रस्तावित आहे.भोईवाडा व नारपोली पोलीस ठाण्यांची हद्द कमी करून कारिवली पोलीस ठाणे प्रस्तावित आहे. तर, नारपोली पोलीस ठाण्याच्या सध्याच्या हद्दीची विभागणी करून दापोडे पोलीस ठाणे प्रस्तावित आहे. भिवंडीचे पहिले पोलीस ठाणे असलेल्या तालुका पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्राचे विलीनीकरण नवीन चार पोलीस ठाण्यांत करण्याबाबत प्रस्तावात नमूद केले आहे. भिवंडीचे झपाट्याने नागरीकरण होत असताना पोलीसकामांतदेखील सुसूत्रता यावी, यासाठी हा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे.या प्रस्तावानुसार गुन्हेगारीवर अंकुश व गुन्हे प्रकटीकरणास गती मिळणार आहे.ही सर्व नियोजित पोलीस ठाणी मिळून एकूण १० पोलीस ठाणे परिमंडळ २ मध्ये होणार आहे.या सर्व पोलीस ठाण्यांवर नियंत्रण ठेवण्याकरिता सध्याचा अधिकारीवर्ग कमी असून नव्याने अतिरिक्त पोलीस आयुक्त,नवीन दोन सहायक पोलीस आयुक्त व एक पोलीस उपायुक्त आणि मनुष्यबळाची मागणी प्रस्तावात केलेली आहे.शहर व ग्रामीणची भौगोलिक परिस्थिती तसेच झपाट्याने होणारे नागरीकरण व औद्योगिकीकरण यामुळे अस्तित्वात असलेली पोलीस यंत्रणा भविष्यात कमी पडणार आहे.याचा सारासार विचार करून शहरातील लोकप्रतिनिधी, समाजसेवक, पोलीस विभाग आणि संबंधित विभागाने मिळून शासनाकडे हा प्रस्ताव पाठविला आहे. त्याचप्रमाणे सर्व अधिकारी व कर्मचारी यांना राहण्याची निवासस्थानेदेखील शासनाने बांधून देण्याविषयी प्रस्तावात नमूद केले आहे. भिवंडी परिमंडळ २ मधील सध्याचे पोलीस उपायुक्त,दोन सहा.पोलीस आयुक्त व पोलीस ठाण्याचे अधिकारी यांना शासकीय निवासस्थाने नसल्याने ते खाजगी ब्लॉकमध्ये भाड्याने राहत आहेत.तर, पोलीस नियंत्रणशेजारील पोलीस संकुलातील रूममध्ये १२ पोलीस अधिकारी राहत आहेत.पोलीस नियंत्रण कक्षाच्या पहिल्या मजल्यावर पोलीस उपायुक्तांचे कार्यालय असून ही इमारत जुनी झाल्याने ठिकठिकाणी गळते.तसेच अंतर्गत कामकाजासाठी जागा अपुरी पडते.नियंत्रण कक्षातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी सध्या असलेल्या ड्रेस चेंजिंग रूमची दुरवस्था झाली आहे.सध्या असलेल्या इमारतीच्या बांधकामास तीस वर्षांपेक्षा जास्त वर्षे झाली आहेत. त्यामुळे इमारतीचे नव्याने बांधकाम करून नूतनीकरण करण्याची मागणी केली असून त्यासाठी आमदार महेश चौघुले यांनी इमारतीच्या नूतनीकरणास ५०लाख रुपये व निजामपूर पोलीस ठाण्याच्या नवीन नियोजित इमारतीसाठी २५ लाख रुपये जाहीर केले आहेत. नियोजित इमारती व प्रस्तावित पोलीस ठाणे झाल्यानंतर भिवंडीच्या कार्यक्षेत्रातील पोलिसांच्या कामास गती मिळणार आहे.