शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

कचराकोंडी फुटण्याची चिन्हे

By admin | Updated: November 16, 2016 04:27 IST

कल्याण-डोंबिवली पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी यापूर्वी वारंवार निविदा मागवूनही त्याला प्रतिसाद मिळत

कल्याण : कल्याण-डोंबिवली पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी यापूर्वी वारंवार निविदा मागवूनही त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने कचऱ्याची प्रक्रिया हा विषय वारंवार चर्चेत होता. यावेळी मात्र महापालिकेने मागविलेल्या निविदेला चांगला प्रतिसाद मिळाला असून चारही प्रकल्पांना निविदादारांचा प्रतिसाद मिळाला आहे. या निविदांचे प्रशासनाकडून परीक्षण सुरु असून त्यानंतरच निविदा मंजुरीसाठी स्थायी समितीपुढे सादर केल्या जाणार आहेत. ते पाहता कल्याण-डोंबिवलीतील कचराकोंडी फुटण्याची आशा निर्माण झाली आहे.महापालिकेने आधारवाडी डम्पिंंग ग्राऊं ड शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्यासाठी आत्तापर्यंत दहा वेळी निविदा मागविली होती. तिलाही गेल्या आठवड्यात प्रतिसाद मिळाला. गुजरातमधील सौराष्ट्र इन्व्हायरो कंपनीने त्याची ३० कोटींची निविदा भरली आहे. यापूर्वी नवी मुंबईतील गिरीश इंटरप्रायझेस कंपनीने निविदा सादर केली होती. ही निविदा एकमेव होती आणि जादा दराची असल्याने ती नाकारण्यात आली होती. डम्पिंग ग्राऊंड शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्यासाठी महापालिकेला भरावभूमी क्षेत्रही विकसित करायचे आहे. आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड बंद करण्याच्या निविदेला मिळालेल्या प्रतिसादापाठोपाठ बारावे भरावभूमीसाठी १० कोटी ९० लाखांची आणि मांडा भरावभूमीसाठी ११ कोटी ९० लाखांची निविदा सौराष्ट्र इन्व्हायरो कंपनीने भरली आहे. उंबर्डे येथील घनकचरा प्रकल्पासाठी दोन निविदा मिळाल्या आहेत. त्यापैकी सौराष्ट्र इन्व्हायरो कंपनीने १६ कोटी ४१ लाखांची निविदा भरली आहे. ठाण्यातील बायोक्लिन या कंपनीने याच प्रकल्पासाठी २४ कोटींची निविदा सादर केली आहे. ही निविदा इन्व्हायरो कंपनीने भरलेल्या किंमतीपेक्षा आठ कोटींहून अधिक रकमेची आहे. त्यामुळे उंबर्डे प्रकल्पाच्या निविदेत स्पर्धा होणार आहे. अर्थात कमी किंमतीची निविदा स्वीकारली जाण्याची दाट शक्यता आहे. या सर्व निविदा प्रशासनाने लेखा परीक्षणासाठी पाठविल्या आहेत. त्यानंतर त्या मंजुरीसाठी स्थायी समितीसमोर ठेवल्या जाणार आहेत. उंबर्डे येथील १० हेक्टर जागेवर ३०० मेट्रिक टन क्षमतेचा प्रकल्प उभा करणे अपेक्षित आहे. त्यात कचऱ्याचे वर्गीकरण, त्यापासून खत निर्मिती करण्यात येणार आहे. त्याचबरोबर आधारवाडी डंपिंग ग्राऊंड बंद करण्याची प्रक्रिया सुरु झाल्यावर बारावे येथील २.२३ हेक्टर जागेवरील भरावभूमी विकसित करण्यात येईल. त्याठिकाणी २०० मेट्रिक टन कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया केली जाईल. तसेच मांडा येथील ९ हेक्टर जागेवर १५ मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी भरावभूमी विकसीत होणार आहे. (प्रतिनिधी)