शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सामूहिक शेतीचा पहिला प्रयोग यशस्वी

By admin | Updated: February 21, 2016 02:34 IST

ठाणे व पालघर जिल्ह्यांत बटाट्यांचे उत्पादन होत नाही. मात्र, वाडा तालुक्यातील काही तरुणांनी एकत्र येऊन आपापल्या शेतात प्रायोगिक तत्त्वावर २५ एकरांत या वाणाची लागवड केली आहे.

- वसंत भोईर,  वाडाठाणे व पालघर जिल्ह्यांत बटाट्यांचे उत्पादन होत नाही. मात्र, वाडा तालुक्यातील काही तरुणांनी एकत्र येऊन आपापल्या शेतात प्रायोगिक तत्त्वावर २५ एकरांत या वाणाची लागवड केली आहे. हा पहिला प्रयोग येथील तरुण शेतकऱ्यांनी यशस्वी करून दाखवला असून शिवजयंतीच्या मुहूर्तावर आंबिस्ते बु. येथील शेतकरी संजय पाटील व कोंडू पाटील यांच्या शेतातील बटाटे काढण्यात आले. काढलेले बटाटे शांतिदूत ग्रुप फार्मिंगमार्फत थेट ग्राहकांना घरपोच पुरवण्यात येणार असल्याची माहिती प्रफुल्ल पाटील यांनी दिली.तालुक्यातील देवघर, गांध्रे, आंबिस्ते बु., ढाढते, घोटमाळ, पालसई, विलकोस, निचोळे, बावेघर, शेलटा, बोरांडा या गावांत सुमारे २५ एकर जागेत या वर्षी बटाट्यांची लागवड केली आहे. बटाट्याची लागवड थंडीच्या काळात केली जाते. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ही लागवड केली असून हे पीक आता तयार झाले आहे. एक एकर जागेत ७०० ते ८०० किलो बियाणे लागले असून एकरी २३ हजार झाडे बसतात तर पीक १० ते १५ टनांपर्यंत येते. एका एकरावर शेती केल्यास हंगामी १ लाख ४० हजारांपर्यंत नफा मिळतो.शेतकऱ्यांची खंत...वाड्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून कुठलेही सहकार्य मिळत नसल्याची खंत आंबिस्ते येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केली. कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारी ही शेती असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या तरुणांचा शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. नोकरीपेक्षा जास्त पैसा आपण कमावू शकतो, असा आत्मविश्वास त्यांना आहे. मजुरांची कमतरता, खते, औषधांचा तुटवडा या गोष्टींमुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होते. मात्र, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून येथील शेतकऱ्यांनी नवी हरितक्रांती घडवण्यासाठी बटाट्याच्या शेतीचा पहिला प्रयोग यशस्वी केला आहे.बटाटा शेतीही तालुक्यात नव्हे तर कोकणात प्रथमच केली जात असावी, म्हणून येथील शेतकऱ्यांच्या सहली काढून त्यांना प्रत्यक्ष माहिती देण्यात आली. त्यानंतर, येथील शेतकऱ्यांनी संवाद साधल्यानंतर ही शेती सोपी व जास्त उत्पन्न देणारी असल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आल्याने ती येथे सुरू केली आहे. बटाटा शेती या वर्षी प्रायोगिक तत्त्वावर २५ एकर क्षेत्रात केली असली तरी पुढील वर्षात ५०० एकर क्षेत्रात करण्याचा विचार आहे.वेफर्ससाठी हा बटाटा ९० दिवसांत तयार होतो, तर भाजीसाठी ७५ दिवसांत तयार होतो. येथील तरुण शेतकरी प्रफुल्ल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शांतिदूत ग्रुप फार्मिंगची स्थापना करण्यात आली आहे. बटाटा शेतीसाठी बी-बियाणेतज्ज्ञ गणेश पवार व तज्ज्ञ शेतकरी अरुण मोरे, परदेशातील तज्ज्ञांनीही या शेतीसाठी वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे.