शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

१९९५ च्या पहिल्याच निवडणुकीत शिवसेनेला यश

By admin | Updated: October 10, 2015 00:07 IST

केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असतानाही केडीएमसीच्या पहिल्याच १९९५ च्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा एकमेकांसमोर उभे ठाकले होते. शिवसेना-भाजपा-काँग्रेस

- प्रशांत माने,  कल्याणकेंद्रात आणि राज्यात सत्तेवर असतानाही केडीएमसीच्या पहिल्याच १९९५ च्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा एकमेकांसमोर उभे ठाकले होते. शिवसेना-भाजपा-काँग्रेस अशा तिरंगी झालेल्या लढतीत शिवसेनेने घवघवीत यश संपादन केले, तर भाजपाला विरोधी पक्षात बसावे लागले. कल्याण-डोंबिवली हा बालेकिल्ला कोणाचा, हे ठरविणारी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची झाली होती.केंद्रात, राज्यात सत्ता असल्याने केडीएमसीच्या निवडणुकीत युती होईल, अशी शक्यता होती. महापालिकेचे एकूण ९६ प्रभाग होते. दरम्यान, त्या वेळीही २७ गावांतील संघर्ष समितीने निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याने ८६ प्रभागांमध्ये निवडणुका झाल्या. या ८६ जागांच्या वाटपावर चर्चा सुरू झाल्या खऱ्या, परंतु वाटपाचे सूत्र ठरत नव्हते.शिवसेनेला घवघवीत यशनिवडणुकीत एकमेकांसमोर उभे ठाकलेल्या सेना-भाजपाकडून एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्या. दोन्ही पक्षांतील भांडणाचा फायदा काँग्रेस उठवेल, अशी अपेक्षा होती. परंतु, ती कालांतराने फोल ठरली. शिवसेनाविरुद्ध भाजपाविरुद्ध काँग्रेस अशा तिरंगी लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.या निवडणुकीच्या प्रचारात शिवसेनेच्या वतीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री मनोहर जोशी, भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे तर भाजपाच्या वतीने उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन आदी दिग्गज नेते उतरले होते. दरम्यान, निवडणुकीच्या निकालात ८६ पैकी ४० जागा जिंकून शिवसेना सत्तेच्या जवळपास पोहोचली. बहुमतासाठी त्यांना ५ जणांच्या पाठिंब्याची आवश्यकता होती. सर्व ६ अपक्षांनी त्यांना पाठिंबा दिला. यात शिवसेनेने सत्ता काबीज केली तर बालेकिल्ला असल्याच्या भ्रमात असलेल्या भाजपाचा मात्र चांगलाच भ्रमनिरास झाला. त्यांना २३ जागांवर तर काँग्रेसला १७ जागांवर विजय मिळविता आला. दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या भाजपाला विरोधी पक्ष म्हणून समाधान मानावे लागले.५० टकके जागांचा होता आग्रह आधीच्या कल्याण-डोंबिवली नगरपालिकेमध्ये भाजपाची सत्ता होती. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीत अधिक जागा हव्यात, असा दावा त्यांनी केला होता. शिवसेनेला २५ च्या आसपास जागा सोडण्यास भाजपा तयार झाली होती. परंतु, हे शिवसेनेला मान्य नव्हते. त्यांनी ५० टकके जागांचा आग्रह धरला होता. अखेर, जागावाटपावरून बोलणी फिस्कटल्याने युती होऊ शकली नाही.