शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

लढत २०१५ : सर्वांचीच प्रतिष्ठा पणाला; युतीचा विचका?

By admin | Updated: October 14, 2015 02:34 IST

केंद्रात आणि राज्यात युतीची सत्ता असलीतरी पुन्हा एकदा स्थानिक पातळीवर जागावाटपावरून युतीचा विचका झाला आहे. १९९५, २००० प्रमाणे यंदाही

प्रशांत माने, कल्याणकेंद्रात आणि राज्यात युतीची सत्ता असलीतरी पुन्हा एकदा स्थानिक पातळीवर जागावाटपावरून युतीचा विचका झाला आहे. १९९५, २००० प्रमाणे यंदाही (२०१५) शिवसेना-भाजपाच्या उमेदवारांनी स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल केल्याने युती तुटल्याची चर्चा आहे. परंतु, याची औपचारीक घोषणा अद्यापपर्यंत झालेली नाही. दुसरीकडे झालेली आघाडी काँग्रेस - राष्ट्रवादीला तारेल का? तर लाट ओसरलेल्या मनसेचा करिष्मा यंदा चालेल का? हे देखील या निवडणुकीत पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.२००२ मध्ये वगळलेल्या २७ गावांचा या निवडणुकीपूर्वी पुन्हा केडीएमसीत समावेश झाला आहे. नव्या प्रभाग रचनेत प्रभागांची संख्या १०७ वरून १२२ वर पोहोचली आहे. नव्या १५ प्रभागांची वाढ झाली आहे. 122जागांमध्ये बहुमतासाठी ६१ हून अधिक जागा मिळविणे आवश्यक असल्याने सर्वच पक्षांचा ‘कस’ लागणार आहे. भाजपला मागील २०१० च्या निवडणुकीत केवळ ९ जागा मिळाल्या आहेत. दरम्यानच्या काळात या नऊ पैकी दोन नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. भाजपच्या गळाला राष्ट्रवादीचे काही नगरसेवक लागले असलेतरी यंदाच्या निवडणुकीत त्यांच्यापुढे ‘जागा वाढविणे’ हे मोठे आव्हान असणार आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील मोदी लाटेत भाजपाला भरभरून मते मिळाली आहेत. याचा फायदा महापालिकेच्या निवडणुकीत होतो का? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. केंद्रात आणि राज्यातील सत्ता गमावलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष या निवडणुकीत आघाडी करून लढत आहेत. याचा फायदा या दोघांना किती होईल? हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मनसेचा दारूण पराभव झाला आहे. यात मनसेची लाट ओसरल्याचे चित्र असताना राज ठाकरे नावाचा करिष्मा यंदा कितपत चालेल? हा देखील संशोधनाचा विषय आहे.