शहरं
Join us  
Trending Stories
1
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
2
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
3
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
4
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
5
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
6
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
7
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
8
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
9
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
10
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
11
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
12
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
13
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
14
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
15
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
16
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
17
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
18
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
19
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
20
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत वाहतूक पोलिसांना मारहाण

By admin | Updated: March 27, 2017 03:45 IST

आनंद दिघे चौकात चुकीच्या ठिकाणी पार्क केलेल्या कारला जॅमर लावल्याचा राग आल्याने कारचालक आणि त्याच्या

भिवंडी : आनंद दिघे चौकात चुकीच्या ठिकाणी पार्क केलेल्या कारला जॅमर लावल्याचा राग आल्याने कारचालक आणि त्याच्या साथीदाराने वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पोलीस शिपायाला मारहाण केली. दोघांनाही अटक झाली असून त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. या धक्काबुक्कीचा व्हिडीओ व्हायरल झाला. आनंद दिघे चौक ते एसटी स्थानकादरम्यान सरकारी कार्यालये आहेत. या भागात कोठेही कार्यालयांबाहेर पार्किंगसाठी जागा नाही. तसेच या रस्त्यावर ‘नो पार्किंग’चे बोर्डही लावलेले नाहीत. बापगाव येथील रहिवासी कैलास पारीख व मीरा रोड येथील भाविन मेहता यांनीही २३ मार्चला रिजेंन्ट हॉटेलसमोर कार लावली आणि ते आत गेले. येथे नेहमी दुचाकी व चारचाकी वाहने उभी असतात. मात्र, ही नवीन गाडी दिसल्याने पोलिसांनी तिला जॅमर लावला. याचा जाब विचारल्याने वाहतूक पोलीस शिपाई शिंदे यांनी पारीख याचे लायसन्स ताब्यात घेतले. तोवर पोलीस निरीक्षक गणपतराव घाडगे तेथे आले. तेव्हा कारला जॅमर लावण्यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. दरम्यान, पारीख याने घाडगे यांची कॉलर पकडून त्यांना गाडीबाहेर खेचत जमिनीवर पाडले, तर भाविन मेहता याने शिपाई शिंदे याला धक्का देत त्यांच्या हातातील लायसन्स खेचून घेतले. (प्रतिनिधी)