शहरं
Join us  
Trending Stories
1
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
2
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
5
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
6
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
7
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
9
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
10
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
11
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
12
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
13
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
14
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
15
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
16
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
17
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
18
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
19
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
20
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
Daily Top 2Weekly Top 5

बनावट नोटाप्रकरणी त्रिकुटाला अटक

By admin | Updated: October 6, 2015 00:29 IST

शनिवारी हजाराच्या ४०६ बनावट नोटांप्रकरणी ठाण्यात अटक केलेल्या त्रिकुटाला शुक्रवारी ९ आॅक्टोबरपर्यंत कोठडी मिळाली आहे. त्यापैकी एक बांगलादेशी अब्दुल्ला याच्याकडे पासपोर्ट

ठाणे : शनिवारी हजाराच्या ४०६ बनावट नोटांप्रकरणी ठाण्यात अटक केलेल्या त्रिकुटाला शुक्रवारी ९ आॅक्टोबरपर्यंत कोठडी मिळाली आहे. त्यापैकी एक बांगलादेशी अब्दुल्ला याच्याकडे पासपोर्ट सापडला असून तो भारतात आल्यावर मोटू सोपान मंडल या नावाने वावरत असल्याची माहिती त्याने पोलिसांनी दिली.ठाणे, सिडको येथे काही जण भारतीय बनावट नोटा वटविण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस हवालदार भोसले यांना मिळाली होती. त्यानुसार, ठाणे शहर अमली पदार्थविरोधी पथक आणि अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंधक पथकाने सापळा रचून बांगलादेशी अब्दुल्ला, मोहंमद खान, नजमुल शेख या त्रिकुटाला ताब्यात घेतले.त्या वेळी त्यांच्याकडे एक हजारांच्या ४२ बनावट नोटा सापडल्या. तसेच ते तिघे मुंब्य्रात एकाच घरात राहत असल्याने त्यांच्या घरझडतीत ३ लाख ६४ हजारांच्या बनावट नोटा सापडल्या. अशा एकूण एक हजारांच्या ४०६ बनावट नोटा सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली. अब्दुल्ला हा मुंब्रा, दिवा परिसरात राहत होता. तसेच त्याच्याकडे पासपोर्टसह मोटू मंडल या नावाने आधारकार्ड व पॅनकॉर्ड सापडले आहे. याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून रविवारी त्यांना न्यायालयात हजर केले. त्या वेळी त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती ठाणे शहर पोलीस जनसंपर्क अधिकारी गजानन काबदुले यांनी दिली. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंदार धर्माधिकारी करीत आहेत. (प्रतिनिधी)