ठाण्यात खळबळ; जिल्हा रुग्णालयातून कोरोनाबाधित रुग्णाचे पलायन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2020 22:03 IST2020-12-19T22:03:27+5:302020-12-19T22:03:46+5:30
corona Virus News: ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन पथकांद्वारे फरार आरोपीचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती ठाणे नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामराव सोमवंशी यांनी दिली.

ठाण्यात खळबळ; जिल्हा रुग्णालयातून कोरोनाबाधित रुग्णाचे पलायन
ठाणे : कोरोनाबाधित असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्ण कैद्याने बाथरुमला जातो असे सांगून पलायन केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार कैद्याचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पप्पू यादव (25) असे पलायन केलेल्या आरोपीचे नाव आहे. मोबाईल चोरीच्या आरोप खाली पप्पू यादव याला ठाणे नगर पोलिसांनी अटक केली. तसेच त्याला पोलीस स्टेशन मधील अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. त्यावेळी यादव याची अंटीजेन टेस्ट केली असता, त्यात त्याला कोरोनाची लागण झाल्याचे निषपन्न झाले. त्यावेळी त्याला 11 डिसेंबर रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर शुक्रवार 18 डिसेंबर रोजी मध्यरात्री 3.30 वाजेच्या दरम्यान, बाथरुमला जायचे असल्याचे सांगून टी बाथरुमला गेला.
बाथरूम मधील एक्झॉस्ट फॅन उचकटून त्याद्वारे पळून गेला, या प्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन पथकांद्वारे फरार आरोपीचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती ठाणे नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामराव सोमवंशी यांनी दिली.