जिल्हाधिकारी कार्यालयावर सरकार विरोधात ठाणे भाजपाचा एल्गार मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 04:35 PM2020-02-25T16:35:51+5:302020-02-25T16:41:04+5:30

 राज्यातील शेतकर्यांची राज्य सरकारने फसवणूक केली. अवकाळी पाऊस व कर्जमाफीमध्ये शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली. तर गेल्या मिहनाभरात महिलांवरील अत्याचारात वाढ झाल्यानंतर सरकार ढिम्म आहे. त्याचा निदर्शनावेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला. ठाणे शहरातील जनतेची शिवसेनेकडून फसवणूक करण्यात आली. महापालिकेच्या निवडणुकीवेळी शिवसेनेने वचननाम्यात ५०० चौरस फुटांपर्यंत मालमत्ता करमाफी देण्याचे आश्वासन दिले होते.

Elgar front of Thane BJP against the government at the collector's office | जिल्हाधिकारी कार्यालयावर सरकार विरोधात ठाणे भाजपाचा एल्गार मोर्चा

आमदार व भाजपाचे शहराध्यक्ष निरंजन डावखरे यांनी व्यक्त केला.भाजपाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना निवेदन दिले

Next
ठळक मुद्देआश्वासने पूर्ण न करता केलेल्या फसवणुकीविरोधात भाजपा कार्यकर्त्यांनी लक्ष वेधले शिवसेनेने वचननाम्यात ५०० चौरस फुटांपर्यंत मालमत्ता करमाफीलोकसंख्येच्या प्रमाणात ३२ ऐवजी ४२ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा

ठाणे : राज्यातील महाविकास आघाडी सरकारविरोधात ठाण्यात आज एल्गार केला. शेतकर्यांची फसवणूक, महिलांवरील वाढते अत्याचार आदींबरोबरच शिवसेनेने ठाण्यातील जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण न करता केलेल्या फसवणुकीविरोधात भाजपा कार्यकर्त्यांनी लक्ष वेधले. ठाण्यातील जनतेच्या मागण्यांसाठी आगामी काळात आणखी उग्र आंदोलने करण्याचा निर्धार आमदार व भाजपाचे शहराध्यक्ष निरंजन डावखरे यांनी व्यक्त केला.भाजपाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना निवेदन दिले.
       राज्यातील शेतकर्यांची राज्य सरकारने फसवणूक केली. अवकाळी पाऊस व कर्जमाफीमध्ये शेतकर्यांच्या तोंडाला पाने पुसण्यात आली. तर गेल्या मिहनाभरात महिलांवरील अत्याचारात वाढ झाल्यानंतर सरकार ढिम्म आहे. त्याचा निदर्शनावेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला. ठाणे शहरातील जनतेची शिवसेनेकडून फसवणूक करण्यात आली. महापालिकेच्या निवडणुकीवेळी शिवसेनेने वचननाम्यात ५०० चौरस फुटांपर्यंत मालमत्ता करमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्याची पूर्तता करण्यात आलेली नाही. कळवा-ऐरोली रेल्वेमार्गाच्या कामातील विस्थापित दोन हजार १०० कुटूंबाना कळव्यातच घरे द्यावी, दिवा परिसराला लोकसंख्येच्या प्रमाणात ३२ ऐवजी ४२ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करावा. तसेच चोरीला जाणार्या सात दशलक्ष लिटर पाणीचोरीची चौकशी करावी, दिवा भागात आरोग्य केंद्र सुरू करावे, दिवा परिसरात बेकायदेशीररित्या डंपिंग ग्राऊंडवर टाकण्यात येणार्या ८०० मेट्रिक टन कचर्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याने डंपिंग ग्राऊंड तातडीने बंद करावे, अशा मागण्या डावखरे यांनी निवेदनाद्वारे केल्या आहेत.
     मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्र म जाहीर करण्यात आला होता. मुंबई व महाराष्ट्रात झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाअंतर्गत ३०० फुटाऐवजी ५०० चौरस फूट चटई क्षेत्र असलेल्या सदनिका देण्याचे जाहीर केले होते. मात्र, या संदर्भात अद्यापि कोणताही निर्णय राज्य सरकारने घेतलेला नाही, याकडेही_ डावखरे यांनी लक्ष वेधले. ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या, निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली
      जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज झालेल्या निदर्शनात माजी खासदार करीट सोमय्या, आमदार संजय केळकर, आमदार व शहराध्यक्ष निरंजन डावखरे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा अ‍ॅड. माधवी नाईक, महापालिकेतील गटनेते संजय वाघुले, नगरसेवक अ‍ॅड. संदीप लेले, मिलिंद पाटणकर, नारायण पवार, भरत चव्हाण, मनोहर डुंबरे, मुकेश मोकाशी, कृष्णा पाटील, सुनेश जोशी, नगरसेविका आशा सिंह, प्रतिभा मढवी, दिपा गावंड, अर्चना मणेरा, मृणाल पेंडसे, कविता पाटील, नंदा पाटील, नम्रता कोळी, महिला आघाडीच्या हर्षला बुबेरा, मनोहर सुगदरे, भाजयुमोचे निलेश पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते कैलास म्हात्रे, जयेंद्र कोळी, राजेश मढवी, दिपक जाधव, सागर भदे, स्वानंद गांगल आदी सहभागी झाले होते.

Web Title: Elgar front of Thane BJP against the government at the collector's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.