महावितरणच्या नाट्यस्पर्धेत भांडुपच्या 'ती रात्र'ची बाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 03:17 PM2018-10-11T15:17:47+5:302018-10-11T15:20:42+5:30

महावितरणच्या कोकण प्रादेशिक कार्यालय अंतर्गत आंतर परिमंडलीय नाट्यस्पर्धेत ‘ती रात्र’ या नाटकाने प्रथम क्रमांक मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले.

drama competition of MSEDCL, 'ti ratra' play won the first prize | महावितरणच्या नाट्यस्पर्धेत भांडुपच्या 'ती रात्र'ची बाजी

महावितरणच्या नाट्यस्पर्धेत भांडुपच्या 'ती रात्र'ची बाजी

Next

महावितरणच्या कोकण प्रादेशिक कार्यालय अंतर्गत आंतर परिमंडलीय नाट्यस्पर्धेत ‘ती रात्र’ या नाटकाने प्रथम क्रमांक मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले. या नाटकाची मांडणी सायको-सस्पेन्स पद्धतीने करण्यात आली होती. एखादी घटना मानवी मनात कशी घर करून राहते व मानवी आयुष्यावर त्याचे कसे बरे-वाईट सुप्त परिणाम होत असतात याची सुंदर मांडणी या नाटकात करण्यात आली होती.  या नाटकाचे लेखन हेमंत एदलाबादकर यांनी तर दिग्दर्शन डॉ.संदीप वंजारी यांनी केले आहे. विजेत्या संघाला प्रादेशिक संचालक श्रीकांत जलतारे यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. या विजयानंतर ‘ती रात्र’ या नाटकाची निवड औरंगाबाद येथे महावितरणच्या राज्य पातळीवरील होणाऱ्या स्पर्धेकरता झाली आहे. 

यावेळी कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता रफीक शेख, भांडुप नागरी परिमंडलाच्या मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण, नाशिक परिमंडलाचे मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर, रत्नागिरी परिमंडलाच्या मुख्य अभियंता रंजना पगारे, सुमित कुमार उपस्थित होते.  कोकण प्रादेशिक विभागांतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी ही नाट्य स्पर्धा आचार्य अत्रे नाट्य रंगमंदिर, कल्याण (पश्चिम) येथे दिनांक ०९ व १० ऑक्टोबर २०१८ रोजी करण्यात आले होते.

तत्पूर्वी आजच्या पहिल्या सत्रात प्रकाशगड या सांघिक कार्यालयाचे ‘अशुद्ध बिजा पोटी’ हे नाटक सादर झाले. भारत पाकिस्तान फाळणीवर नंतर समाजाच्या मनावर राहिलेल्या खुणा, त्यातून स्वार्थापोटी उसळणारा जमातवाद आणि स्वार्थी राजकारण व माणुसकीची शिकवण या संकल्पनेवर हे नाटक आधारित होते. या नाटकाचे लेखन केदार देसाई यांनी तर दिग्दर्शन विनोद गोसावी  यांनी केले आहे.  दुसऱ्या  सत्रात कल्याण परिमंडलाचे 'तथास्तु' हे डॉ.संतोष बोकेफोडे लिखित व दिग्दर्शित नाटक सादर झाले. माणसाने आपले ध्येय साध्य करण्यासाठी नकारात्मक गोष्टींपासून प्रयत्नपूर्वक दूर रहावे. आपल्यातील सकारात्मक ऊर्जाच आपणास अपेक्षित यश मिळवून देऊ शकते. हा या नाटकाचा गाभा होता. 

नाट्यस्पर्धेत वैयक्तिक पातळीवर प्रथम व द्वितीय पुरस्कार प्राप्त कर्मचारी पुढील प्रमाणे-

उत्कृष्ट दिग्दर्शन - संदीप वंजारी (भांडुप), सौ. रेणुका भिसे (नाशिक)

उत्कृष्ट अभिनय (महिला) – दीप्ती थोरात (भांडुप), तंद्रा मोझुमदार (सांघिक कार्यालय, मुंबई)

उत्कृष्ट अभिनय (पुरुष) - संदीप वंजारी (भांडुप), अमोल जाधव, (सांघिक कार्यालय, मुंबई) 

नेपथ्य - महेंद्र चुनारकर (रत्नागिरी), उदय गुरव, महेंद्र चुनारकर (भांडुप)

प्रकाश योजना – संदेश गायकवाड, भूषण कोडकर (सांघिक कार्यालय, मुंबई), रमेश नाईक, अविनाश शेवाळे (भांडुप)

संगीत – संदीप वंजारी, दिलीपकुमार म्हेत्रे (भांडुप), विशाल म्हापणकर (सांघिक कार्यालय, मुंबई)

रंगभूषा व वेशभूषा  – विजय शिंदे (रत्नागिरी), सचिन मोरे, निकेश धुरी, प्रेरणा रहाटे (सांघिक कार्यालय , मुंबई)

बाल कलाकार – भार्गवी शिंदे (सांघिक कार्यालय, मुंबई)

उत्तेजनार्थ (प्रत्येक नाटकातून एक कलाकार) - दीपेश सावंत (भांडुप), सागर अधापुरे (नाशिक), अभव नेवगी (रत्नागिरी), किशोरकुमार साठे (सांघिक कार्यालय, मुंबई), वृषाली पाटील (कल्याण)

पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. परीक्षक म्हणून राहुल वैद्य, रवींद्र कुलकर्णी, सौ.राजश्री निकम यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशांत कांबळे, चंद्रमणी मेश्राम व महेश कारंडे यांनी केले. आयोजन समितीचे प्रमुख तथा अधीक्षक अभियंता सुनील काकडे यांनी आभार मानले.  नाट्यस्पर्धा आयोजन समिती सचिव म्हणून औद्योगिक संबंध अधिकारी भुपेंद्र वाघमारे यांनी काम पाहिले. 

 

Web Title: drama competition of MSEDCL, 'ti ratra' play won the first prize

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.