"...तोपर्यंत कल्याण-शीळ महामार्गावरील टोल घेऊ नका"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 03:02 PM2020-07-20T15:02:47+5:302020-07-20T15:22:49+5:30

कल्याण-शीळ रस्त्यावर काटई येथे महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचा टोल नाका आहे. सदर टोलनाक्यावर केवळ अवजड वाहनांना टोल आकारला जातो.

"... don't take toll on Kalyan-Sheel highway till then" | "...तोपर्यंत कल्याण-शीळ महामार्गावरील टोल घेऊ नका"

"...तोपर्यंत कल्याण-शीळ महामार्गावरील टोल घेऊ नका"

Next

डोंबिवली:  कल्याण-शीळ रस्त्याचे काम पूर्ण होऊन, निळजे येथील नवीन पुलाचे बांधकाम होईपर्यंत सदर रस्त्यावरील काटई येथील टोल नाका बंद करणे बाबत आमदार प्रमोद पाटील यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना सोमवारी पत्र दिले आहे.

कल्याण-शीळ रस्त्यावर काटई येथे महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचा टोल नाका आहे. सदर टोलनाक्यावर केवळ अवजड वाहनांना टोल आकारला जातो. सध्या कल्याण-शीळ रस्त्याचे काम सुरू असून बहुतांश ठिकाणी खोदून ठेवण्यात आला आहे. रस्ता पूर्णपणे खराब झाला असून जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यातच कोरोना च्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन असल्याने रेल्वे सेवा बंद आहे. त्यामुळे ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर सह इतरही प्रवाशांना कल्याण शीळ रस्त्यावरून प्रवास करण्याशिवाय कोणताही पर्याय उपलब्ध नाही. या रस्त्यावर वाढलेली वाहनांची संख्या व   काम सुरू असल्याने  नेहमीच वाहतूक कोंडी असते.

वास्तविक रस्त्याचे काम सुरू असेपर्यंत हा टोल नाका बंद करून टोल वसूल करण्यासाठी उभारण्यात आलेली यंत्रणा काढून टाकावी अशी मागणी पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीमध्ये केली होती. परंतु अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. सद्यस्थिती पाहता निळजे येथील पूल धोकादायक झाल्याने अवजड वाहनांना या रस्त्यावरून बंदीच घालण्यात आली असून टोल नाक्याची व यंत्रणेची सध्या तरी गरज नाही. तसेच टोल नाका बंद झाल्यास वाहतूक कोंडी काही प्रमाणात कमी होऊन,  कल्याण-शीळ रस्त्याचे काम जलदगतीने होऊ शकते. त्याचप्रमाणे निळजे येथील नवीन पुलाचे काम दोन्ही बाजूने सुरू करण्यासाठी हा टोल नाका बंद करून, उभारण्यात आलेली यंत्रणा तातडीने काढून टाकण्याची गरज आहे.

तरी पालकमंत्र्यांनी तातडीने लक्ष घालून प्रवाशांच्या सोयीसाठी व कल्याण-शीळ रस्त्याचे काम जलदगतीने  होण्यासाठी काटई येथील टोल नाका बंद करावा. तसेच निळजे येथील नवीन पुलाचे काम दोन्ही बाजूने सुरू करणे शक्य होण्यासाठी टोल नाक्यासाठी उभारण्यात आलेली या यंत्रणा काढून टाकण्याचे संभंधितांना आदेश द्यावेत, असेही ते म्हणाले.

आणखी बातम्या...

CoronaVirus News : धक्कादायक! मल्टीनॅशनल कंपनीत कोरोनाचा विस्फोट, २८८ कर्मचारी आढळले पॉझिटिव्ह

दूध आंदोलनाला राज्यात सुरुवात, दगडाला अभिषेक घालून केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध

मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांना कोरोनाची लागण    

रावणाने पहिले विमान उड्डाण केले, सिद्ध करण्याचा श्रीलंकेचा दावा    

सरकारी कर्मचार्‍यांसाठी खूशखबर! नाईट शिफ्ट केली तर आता असा होणार फायदा...    

Web Title: "... don't take toll on Kalyan-Sheel highway till then"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे