शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या आंदोलनात राजकारण आणू नका : विश्वनाथ पाटील

By admin | Updated: October 1, 2015 23:26 IST

कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी अत्यंत वाईट परिस्थितीत अडकले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी सर्वांना एकत्र येऊन तीव्र आंदोलन छेडावे लागेल.

वाडा : कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी अत्यंत वाईट परिस्थितीत अडकले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी सर्वांना एकत्र येऊन तीव्र आंदोलन छेडावे लागेल. या शेतकऱ्यांच्या आंदोलनात कुणीही राजकारण आणू नये, असे प्रतिपादन कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांनी वाडा येथे शेतकऱ्यांच्या सभेत केले.३५ सेक्शन, इको-सेन्सेटिव्ह झोन, विविध प्रकल्पांसाठी तसेच महामार्गासाठी संपादित होत असलेली जमीन अशा विविध समस्यांमध्ये ठाणे, पालघर जिल्ह्यांतील हजारो शेतकरी अडकले आहेत. या बाधित शेतकऱ्यांची सभा वाडा येथे वाडा तालुका शेतकरी संघटना व कुणबी सेवा संघ, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. या सभेसाठी मुरबाडमध्ये माजी आमदार दिगंबर विशे, गोटीराम पवार यांच्यासह मोठ्या संख्येने कुणबी समाजाचे शेतकरी उपस्थित होते. येथील शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी सर्वांनी मतभेद विसरून एकत्र येऊन कर्जमुक्तीच्या मागणीबरोबरच विविध समस्यांमध्ये अडकलेल्या शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी लढण्याची तयारी करावी, असे आवाहन विश्वनाथ पाटील यांनी या वेळी केले.ठाणे, पालघर जिल्ह्यांतील ४४ हजार शेतकऱ्यांच्या ६७ हजार हेक्टर शेतजमिनीवर वन खात्याने बेकायदेशीर वनसंज्ञा लावून येथील शेतकऱ्यांना नाहक अडचणीत आणल्याचा आरोप माजी आमदार दिगंबर विशे यांनी या वेळी केला. या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी यापुढे संबंधित मंत्र्यांच्या भेटीगाठी घेणे, न्यायालयीन लढाई व जनआंदोलन उभारणे, अशा तीन प्रकारची लढाई लढली जाईल, असेही ते म्हणाले. ही सभा यशस्वी करण्यासाठी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष हरिभाऊ पाटील, उपाध्यक्ष परशुराम सावंत, हरिश्चंद्र पाटील, रंजन पाटील व कुणबी सेवा संघाचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले होते.