शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
3
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
4
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
5
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
6
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
7
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
8
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
9
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
10
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
11
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
12
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
13
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
14
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
15
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
16
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
17
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
18
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
19
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
20
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोरीचे व्यसन सुटता सुटेना

By admin | Updated: November 6, 2016 04:14 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे सहाय्यक आयुक्त व ‘ह’ प्रभाग क्षेत्र अधिकारी गणेश बोराडे यांना शनिवारी दुसऱ्यांदा लाचप्रकरणात अटक झाली. लाचखोरीच्या

- प्रशांत माने,  कल्याण कल्याण-डोंबिवली महापालिकेचे सहाय्यक आयुक्त व ‘ह’ प्रभाग क्षेत्र अधिकारी गणेश बोराडे यांना शनिवारी दुसऱ्यांदा लाचप्रकरणात अटक झाली. लाचखोरीच्या वाढत्या प्रकरणांमुळे महापालिका पुन्हा चर्चेत आली आहे. मागील काही वर्षांमध्ये १८ ते २० बड्या अधिकाऱ्यांना लाच घेताना अटक झाली आहे. तर बोराडेंना पुन्हा अटक झाल्याने त्यांचे लाचखोरीचे व्यसन काही सुटेना, अशी चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.लाचखोरांना कडक शासन करण्याऐवजी त्यांना पाठीशी घालण्याचे काम लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या संगनमताने होत असल्याची उदाहरणे, याआधी पाहावयास मिळाली आहेत. या ‘अभय’ देण्याच्या प्रवृत्तीमुळेच सध्या लाचखोरीच्या प्रकरणातील बहुतांश अधिकारी महापालिका सेवेत कार्यकारी पदावर आहेत. अनधिकृत बांधकाम असो अथवा नूतनीकरण, कामाचे कार्यादेश देणे असो अथवा ठेकेदारांची बिले मंजूर करणे, अशा विविध कारणांसाठी लाच मागून अमाप काळी माया जमा करणाऱ्यांनी महापालिकेच्या विकासाऐवजी स्वत:चाच विकास साधण्यात धन्यता मानल्याचे वास्तवही पाहावयास मिळत आहे. महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांच्याबरोबर दोन वर्षांत केडीएमसीच्या दोन नगरसेवकांनाही लाचप्रकरणात अटक झाली आहे. तक्रारदाराने केलेल्या बांधकामावर कारवाई न करण्यासाठी एक लाखाची लाच घेताना भाजपाचे नगरसेवक गणेश भाने आणि त्याच्या एका साथीदाराला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ४ आॅक्टोबरला अटक केली होती. याआधी मागील लोकप्रतिनिधींच्या कालावधीत १७ एप्रिल २०१४ ला शिवसेनेचे सहयोगी अपक्ष नगरसेवक विद्याधर भोईर यांना ४ लाखांच्या लाचप्रकरणी अटक झाली होती. त्यांच्याबरोबर तत्कालीन ‘ब’ प्रभाग क्षेत्र अधिकारी दत्तात्रय मस्तूद आणि त्यांचा कर्मचारी विलास कडू, अशा तिघांना अटक झाली होती. दरम्यान, आॅक्टोबरमध्ये घडलेल्या घटनेला महिना उलटत नाही तोच लाचप्रकरणात बोराडे यांना अटक झाली आहे. ‘तो’ दिवसही शनिवार होता1बोराडे यांना यापूर्वी १ फेब्रुवारी २०१४ ला अटक झाली होती. विशेष म्हणजे, तो दिवसही शनिवारच होता. त्यावेळी ‘क’ प्रभागाचे अधिकारी असताना बेकायदा बांधकामांवरील कारवाई टाळण्यासाठी बोराडे यांनी तीन लाखांची लाच मागितली होती. त्यावेळी त्यांच्यासह त्यांचा खाजगी वाहनचालक कय्युम चांद पाशा शेख याला नवी मुंबई लाचलुचपत विरोधी पथकानेही अटक केली होती. मूळचे मुख्य बाजार परवाना निरीक्षक असलेल्या बोराडे यांच्याकडे ‘क’ प्रभाग क्षेत्र अधिकारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली होती.2केडीएमसी मुख्यालयानजीक असलेल्या शंकरराव चौकातील एका दुकानदाराने नूतनीकरणाचे काम काढले होते. या कामासंदर्भात अनेक तक्रारी आल्यावर एमआरटीपीअंतर्गत कारवाई केली जाईल. ती टाळण्यासाठी पाच लाख रुपये द्या, अशी मागणी बोराडे यांनी त्याच्याकडे केली होती. 3अखेर पहिला हप्ता म्हणून दोन लाख रुपये खाजगी वाहनचालक कय्युम शेख यांच्यामार्फत स्वीकारले होते. त्यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी कय्युम आणि लाच मागितल्याप्रकरणी बोराडे यांना अटक केली होती. ती वेळही दुपारचीच होती.