शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राजस्थानमधील रिफायनरीला भीषण आग, पंतप्रधान मोदी उद्या उद्घाटन करणार होते...
2
मद्यावर अल्कोहोलच्या प्रमाणानुसार कर लागणार, असे झाले तर हे राज्य पहिले ठरणार...
3
"व्ही.के.सिंग याने कशी अजित पवारांच्या अपघाताची कागदपत्रे नष्ट केली, याचा...", रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
4
३२ धावांमध्ये टिपले ५ बळी... बांगलादेशच्या नाहिद राणाने न्यूझीलंडच्या फलंदाजांचा उधळला 'डाव'
5
'आम्ही डॉलरऐवजी चिनी युआनमध्ये व्यापार करू', UAE चा अमेरिकेला इशारा; युद्धावरून सुनावले
6
धक्कादायक! इराण देखील एमव्ही तूस्का जहाजाला घेरणार होता, पण क्रू मेंबरचे कुटुंब होते म्हणून...; युद्ध पेटणार...
7
पश्चिम बंगालच्या निवडणुकीआधी वेगळीच खेळी; दारूच्या दुकानांबद्दल झाला मोठा निर्णय
8
डिजिटल लाइफस्टाईलचा धोका; तरुणांच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर होतोय मोठा परिणाम 
9
महिला आरक्षण: सुप्रिया सुळेंनी CM फडणवीसांचे आव्हान स्वीकारले; म्हणाल्या, “वेळ-जागा सांगा”
10
गुरुपुष्यामृत योग २०२६: केवळ सोने खरेदीच नाही, तर आयुष्याला सोन्याची झळाळी देणारा 'गुरुपुष्य' योग!
11
नाशिक TCS प्रकरण: "लग्नानंतर रात्री कशात व्यस्त असतेस?" चौथ्या पीडितेचा थरकाप उडवणारा जबाब
12
गाडी खरेदी करताना शोरूममधूनच इन्शुरन्स घेणे बंधनकारक आहे का? काय आहे नियम?
13
IPL 2026: रोहित शर्मा सलग दुसऱ्या सामन्यालाही मुकणार? GT vs MI मॅचआधी आली महत्त्वाची अपडेट
14
जपानमध्ये ७.४ तीव्रतेचा भीषण भूकंप! उत्तर किनारपट्टीला 'सुनामी'चा तडाखा बसण्याची शक्यता; ३ मीटर उंच लाटांचा इशारा
15
प्रार्थना आणि अश्रू..., हवेत ४ तास मृत्यूशी सामना! हैदराबादहून हुबळीला जाणाऱ्या Fly91 मध्ये तांत्रिक बिघाड, सुदैवाने मोठा अनर्थ टळला!
16
एअरटेल ग्राहकांना महागाईचा शॉक! ८४ दिवसांचा प्लॅन महागला, ७९९ चा प्लॅनही हटवला; आता रिचार्जसाठी मोजावे लागणार जास्तीचे पैसे
17
Bank Loan Rejection Reasons: पगार भक्कम असूनही बँक कर्ज नाकारतेय? 'या' ४ चुका ठरू शकतात कारणीभूत!
18
Sade Sati: साडेसातीचा विळखा की परिवर्तनाची संधी? मेष, कुंभ आणि मीन राशींसाठी आगामी काळ कसा असेल?
19
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
20
शेवटची इच्छा पूर्ण! 'स्वरस्वामिनी' आशा भोसले यांच्या अस्थींचे पवित्र गंगेत विसर्जन
Daily Top 2Weekly Top 5

“ST कर्मचाऱ्यांनी ‘प्रवासी सेवा हीच ईश्वर सेवा’ समजून काम करावे”; एकनाथ शिंदेंचा मौलिक सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 17:50 IST

Deputy CM Eknath Shinde News: हे रोल मॉडेल संपूर्ण राज्यभर राबवण्याच्या सूचना एकनाथ शिंदे यांनी दिल्या.

Deputy CM Eknath Shinde News:एसटीच्या पुनरुत्थानासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी  ‘प्रवासी सेवा हीच ईश्वर सेवा!’ समजून काम केले पाहिजे. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यास आमच्या शासन सक्षम आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. खोपट बसस्थानकावरील  नुतनीकरण करण्यात आलेल्या वातानुकूलित चालक-वाहक विश्रांतीगृहाच्या लोकार्पण सोहळ्याच्या वेळी बोलत होते. या कार्यक्रमाला राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर अर्थ व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्यासह एसटी महामंडळाचे प्रभारी उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, एसटीचा चेहरा-मोहरा बदलून फाईव्ह स्टार परिवहन सेवा निर्माण करणे हे आपल्या शासनासमोरील प्रमुख ध्येय असून प्रवाशांना एअरपोर्टसारखी बसपोर्ट उपलब्ध करून देण्यासाठी खाजगी-सार्वजनिक भागीदारीतून नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यावर एसटी महामंडळाने भर दिला पाहिजे. मागील वर्षी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून ५०० कोटी रुपये खर्चून एसटीच्या १९१ बसस्थानक परिसराचे काँक्रिटीकरण करण्याचे काम आपण हाती घेतल्या असून खड्डेमुक्त बसस्थानक हा आपला संकल्प असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

रोल मॉडेल संपूर्ण राज्यभर राबवण्याच्या सूचना

एसटीच्या चालक वाहकांना आपले कर्तव्य करून आल्यानंतर ताण-तणाव मुक्त झोप मिळावी, यासाठी प्रत्येक आगारांमध्ये वातानुकूलित, स्वच्छ व टापटीप असे विश्रांतीगृह निर्माण करण्यात यावे, असे  निर्देश एकनाथ शिंदे यांनी यावेळी एसटी प्रशासनाला दिले. खोपट बसस्थानकावरील नुतनीकरण केलेल्या विश्रांतीगृहाबाबत समाधान व्यक्त करून हे रोल मॉडेल संपूर्ण राज्यभर राबवण्याच्या सूचना एकनाथ शिंदे यांनी  दिल्या.

दरम्यान, राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, एसटी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी यापुढे राज्यभरात सार्वजनिक -खाजगी भागीदारीतून निर्माण होणाऱ्या प्रकल्पामध्ये आगार तेथे १०० खाटांचे कॅशलेस रुग्णालय उभारण्याच्या संकल्प असून, एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसा दिनी या योजनेचा आम्ही शुभारंभ करीत आहोत. भविष्यात या रुग्णालयांमध्ये शासनाच्या  महात्मा फुले जन आरोग्य योजनेबरोबर विविध वैद्यकीय सेवा सुविधा मोफत एसटीच्या  कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार असून त्याचा फायदा त्या परिसरातील प्रवासी व सर्वसामान्य जनतेला देखील मिळणार आहे. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेstate transportएसटीShiv Senaशिवसेनाpratap sarnaikप्रताप सरनाईक