शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

“कार्तिकी एकादशीच्या महापूजेपूर्वीच विठुरायाने ठाण्यात अवतरून मला दर्शन दिले”: एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 08:44 IST

Deputy CM Eknath Shinde News: मी वारकरी आणि शेतकरी कुटुंबातून आलेलो आहे. लहानपणी आजी-आजोबा, आई-वडिलांसोबत पंढरपूरला जात होतो, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

Deputy CM Eknath Shinde News:ठाणे येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उपवनघाट येथे  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ५१ फूट उंचीच्या भव्य विठ्ठल मूर्तीचे अनावरण संपन्न झाले. या वेळी भक्तांची मांदियाळी उसळली होती. मंत्री प्रताप सरनाईक, अन्य मान्यवर व जनतेच्या साक्षीने हा ऐतिहासिक आणि भक्तिमय  सोहळा पार पडला. यानिमित्ताने कार्तिकी एकादशीच्या महापूजेला जाण्यापूर्वीच विठुरायाने ठाण्यात अवतरून मला दर्शन दिले असल्याची भावना शिंदे यांनी व्यक्त केली. 

ठाणे बदलत आहे. हा घाट अहिल्यादेवींच्या नावाने उभारला आहे. मीरा-भाईंदर येथे २ आणि कासार वडवली येथे १ अशा चार ठिकाणी अशा विठ्ठल मूर्ती उभारल्या जातील. आजचा दिवस ठाणेकरांसाठी पवित्र आहे. कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात आपण भगवान पांडुरंगाची सेवा करतो, पण आज तुमच्या सर्वांच्या रूपाने पांडुरंग येथे उपस्थित आहे. पांडुरंगाची 51 फूट उंच अशा भव्य मूर्तीची स्थापना ठाण्यात झाली आहे. हे कार्य प्रताप सरनाईक आणि त्यांच्या टीममुळे शक्य झाले. ठाणेकर भाग्यवान आहेत. मी वारकरी आणि शेतकरी कुटुंबातून आलेलो आहे. लहानपणी आजी-आजोबा, आई-वडिलांसोबत पंढरपूरला जात होतो. आज उपमुख्यमंत्री म्हणून नाही, तर विठ्ठल भक्त म्हणून येथे आलो आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे

तुमच्या आशीर्वादाने शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री हा प्रवास शक्य झाला. वारकरी संप्रदाय जिथे बोलावतो तिथे धावून येतो. वारकरी दिंड्यांना अनुदान, विमा आणि वाहन टोलमुक्ती हे महायुती सरकारनेच केले. पंढरपूरमध्ये स्वच्छता, पाणी, मोबाईल सुविधा, शौचालये उपलब्ध केली आहेत. मी मुख्यमंत्री असताना अनेक लोकाभिमुख योजना राबवल्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना बंद होणार नाही. गोमातेला राज्य मातेचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. शंकराचार्यांनी मला 'काऊ मॅन' ही पदवी दिली आणि ते माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

दरम्यान, अतिवृष्टीमुळे  शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने सरकार मदत करेलच. पण ज्यांच्या घरी लग्न ठरले आहे ते लग्न मोडणार नाही; सर्व खर्च शिवसेना करेल. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला. इंदुरीकर महाराज साध्या, सोप्या भाषेत समाजाला दिशा देतात. हरिनाम सप्ताहात सहभागी झाल्याने वाईट विचार जातात, अशी शिकवण आम्हाला आनंद दिघे यांनी दिली, असे शिंदे यांनी म्हटले आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Eknath Shinde sees Lord Vitthal in Thane before Ekadashi puja.

Web Summary : Deputy CM Eknath Shinde inaugurated a 51-foot Vitthal statue in Thane. He expressed joy, stating he felt blessed with Vitthal's presence before the Ekadashi puja. Shinde highlighted government initiatives for farmers and the Warkari community.
टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेthaneठाणेekadashiएकादशी