वाईट मार्गाला लागण्यापूर्वीच केली सुटका

By Admin | Updated: October 13, 2016 03:28 IST2016-10-13T03:28:07+5:302016-10-13T03:28:07+5:30

दुकानातील काच फुटल्याने वडील रागावतील, म्हणून झारखंडहून पळून आलेल्या देवकुमार नारायण नुनिया (१०) याची वाईट मार्गावर जाण्यापूर्वीच बाजारपेठ पोलिसांच्या सतर्कतेमुळे

Delayed before it gets worse | वाईट मार्गाला लागण्यापूर्वीच केली सुटका

वाईट मार्गाला लागण्यापूर्वीच केली सुटका

कल्याण : दुकानातील काच फुटल्याने वडील रागावतील, म्हणून झारखंडहून पळून आलेल्या देवकुमार नारायण नुनिया (१०) याची वाईट मार्गावर जाण्यापूर्वीच बाजारपेठ पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुटका झाली. झारखंड येथे त्याच्या पालकांशी संपर्कसाधण्यात आला असून लवकरच ते त्याला घेण्यासाठी येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप सूर्यवंशी यांनी सांगितले.
नवरात्रोत्सवानिमित्त दुर्गाडी किल्ल्यावर जत्रा भरते. या ठिकाणी बंदोबस्तावर असणाऱ्या बाजारपेठ पोलिसांना एक लहान मुलगा संशयास्पदरीत्या फिरत असताना आढळला. पोलिसांनी चौकशी केली असता त्याने दिलेल्या माहितीने सर्व जण चक्र ावून गेले. देवकुमार नुनिया (१०) असे या मुलाचे नाव आहे. वडिलांच्या दुकानातील काच फुटल्याने ते रागावतील, म्हणून तो दोन दिवसांपूर्वी घर सोडून इकडे पळून आला. घराजवळ असणाऱ्या रेल्वे स्थानकात आलेल्या मेलमध्ये बसला आणि ठाणे स्थानकात उतरला. त्या वेळी फलाटावरील काही मुलांनी त्याला हेरले आणि त्यांच्यासोबत घेऊन गेले. त्यानंतर, सुरेश नावाच्या व्यक्तीने त्याला दुर्गाडी परिसरात सुरू असलेल्या जत्रेत चोरीसाठी पाठवल्याची माहिती सूर्यवंशी यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Delayed before it gets worse