शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

‘निर्मल भारत’ अभियानाचा प्रभागात बोजवारा

By admin | Updated: August 19, 2015 23:54 IST

केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून ‘निर्मल योजनेंंतर्गत’ ज्या भागात शौचालयांची आवश्यकता आहे, अशा भागात स्वच्छतागृहे उभारण्यासाठी शेकडो कोटी रुपयांचे अनुदान स्थानिक

दिवाकर गोळपकर, कोळसेवाडीकेंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून ‘निर्मल योजनेंंतर्गत’ ज्या भागात शौचालयांची आवश्यकता आहे, अशा भागात स्वच्छतागृहे उभारण्यासाठी शेकडो कोटी रुपयांचे अनुदान स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत खर्च झाले आहे. केडीएमसीतर्फे मनपा क्षेत्रातसुद्धा ही योजना राबविण्यात आली. परंतु, सर्व प्रभागांतील स्वच्छतागृहांची सद्यस्थिती पाहता शेकडो कोटी रुपयांचे अनुदान मनपा प्रशासन, लोकप्रतिनिधी व ठेकेदारांनी मिळून मातीत घातले आहे, असेच दिसून येते.कल्याण (पूर्व), प्रभाग क्र. ६१ मध्ये कचोरे, हनुमाननगर, नवीन गोविंदवाडी, श्रीकृष्णनगर, स्रेहवर्धकनगर, वाघचौरे चाळ, नेतिवली मनपा शाळेजवळील परिसरात सार्वजनिक शौचालये आहेत. सुरुवातीच्या काळात नागरिकांच्या व संबंधित संस्थेच्या सहकार्याने ती चांगली चालली. परंतु, कालांतराने आर्थिक आणि व्यक्तिगत स्वार्थामुळे त्यावरचे नियंत्रण सैल झाले. हम करे सो कायदा सुरू झाला. स्वच्छतेबाबत अक्षम्य दुर्लक्ष झाले. नेतिवली टेकडीवरील वस्ती स्वच्छतागृह कौसलबानू नावाची महिला संस्था सेवा आणि उपजीविकेच्या भावनेतून चालवते. परंतु निकृष्ट दर्जाचे बांधकाम व सदोष ड्रेनेज व्यवस्थेमुळे इमारतीच्या मागील बाजूला मैला साचलेला आहे. तो वाहून जाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे रहिवाशांना दुर्गंधी व रोगट वातावरणास सामोरे जावे लागत आहे. वरच्या मजल्यावरील पुरुषांची १२ कुपे व खालच्या मजल्यावरील १० कुपे पाणीगळतीमुळे बंद ठेवली आहेत. प्रत्येक लाभार्थ्याकडून दरमहा नाममात्र पैसे घेऊन त्यातून देखभाल व स्वच्छतेचे काम केले जाते. खरे म्हणजे स्वच्छतागृहाचे सांडपाणी ड्रेनेजला जोडले जाऊ शकते, पण ते करणार कोण? थोड्या फार फरकाने सर्वच शौचालयांची अशी दयनीय अवस्था असल्याचे नागरिकांनी सांगितले.या प्रभागाची लोकसंख्या सर्वसाधारण १२, १०० आहे. कचोरेगाव, हनुमाननगर, श्रीकृष्णनगर, स्नेहवर्धक नगर, वाघचौरे चाळ, मेट्रो मॉल परिसर, ओमकारनगर यांचा मिळून प्रभाग होतो.