शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

पंचधातूच्या मूर्तीचा एक कोटीमध्ये सौदा

By admin | Updated: September 29, 2015 23:45 IST

आठव्या शतकातील पंचधातूंची भगवान महावीरांची पुरातन मूर्तीची एक कोटींमध्ये तस्करी करण्यासाठी आलेल्या मंगेश साळवी (५०) आणि कमलेश अजमेरा (४६) या डोंबिवलीतील दोघांना ठाणे

ठाणे : आठव्या शतकातील पंचधातूंची भगवान महावीरांची पुरातन मूर्तीची एक कोटींमध्ये तस्करी करण्यासाठी आलेल्या मंगेश साळवी (५०) आणि कमलेश अजमेरा (४६) या डोंबिवलीतील दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. त्यांच्याकडून अ‍ॅक्रेलिक बॉक्समध्ये साडे तीन किलोची ही मूर्तीही पोलिसांनी हस्तगत केली.या मूर्तीच्या विक्रीसाठी हे दोघे कळवा नाका येथे येणार असल्याची माहिती युनिट एकचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक नितिन ठाकरे आणि उपनिरीक्षक अभिजित भुजबळ यांना मिळाली होती. याच माहितीच्या अनुषंगाने त्यांना २५ सप्टेंबर रोजी मूर्तीसह सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. ती आठ ते दहाव्या शतकातील असल्याची माहिती इतिहास संशोधकांकडून पोलिसांना मिळाली. तिची एक कोटींमध्ये विक्री केली जाणार होती, अशी माहिती तपासात उघड झाली. ही मूर्ती नेमकी किती वर्ष पुरातन आहे, ती कोणत्या मिश्र धातूंची बनलेली आहे. याबाबतची माहिती पुरातत्व विभागाकडून घेण्यात येत असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. ती कोणत्या मंदीरातून अथवा वस्तू संग्रहालमयातून चोरीस गेली आहे किंवा एखाद्या उत्खननातून मिळाली का? याबबातचाही तपास सुरु आहे. पोलीस आयुक्त परमवीर सिंग, सह पोलीस आयुक्त लक्ष्मीनारायण, अपर पोलीस आयुक्त शिवाजी बोडखे, उपायुक्त पराग मणेरे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त नागेश लोहार आदींच्या मार्गदर्शनाखाली युनिट एकचे पथक याचा तपास करीत आहेत. यातील साळवी आणि अजमेरा या दोघांनाही ३० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. (प्रतिनिधी)