शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
3
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
4
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
5
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
6
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
7
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
8
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
9
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
10
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
11
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
12
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
13
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
14
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
15
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
16
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
17
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
18
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
19
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
20
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

दसरा सण मोठा; यंदा आनंदाला तोटा...!

By admin | Updated: October 12, 2016 04:45 IST

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या खरेदीवर यंदा मंदीचे मळभ दाटून आल्याचे दिसून आले. सोन्याची खरेदी अवघी ३० टक्क्यांवर आली,

ठाणे : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या खरेदीवर यंदा मंदीचे मळभ दाटून आल्याचे दिसून आले. सोन्याची खरेदी अवघी ३० टक्क्यांवर आली, तर घरांची अवघी २० टक्के नोंदणी झाली. वाहनांच्या बुकींगवरही निरूत्साहाचा परिणाम दिसून आवा. त्यांची खरेदी अवघी ६० टक्के झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. सोन्याच्या, खास करून दागिन्यांच्या खरेदीकडील कल गेले काही दिवस कमी होतो आहे. त्यातही गुंतवणुकीसाठी पेपर सोन्याला पंसती मिळू लागल्याने मुहूर्ताच्या दिवशी फक्त वळ््याची खरेदी होत असल्याचे दिसून आले. सोन्याच्या गुंतवणुकीतील परतावाही कमी होत गेल्याने त्याचा आणि दराचा एकत्र परिणाम खरेदीवर झाल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. घरांच्या किंमतीही मध्यमवर्गीयांच्या आवाक्याबाहेर गेल्याने, नव्या गृहप्रकल्पांसाठी पायाभूत सुविधांची वानवा असल्याने एकंदरीतच घरखरेदीवर त्याचा परिणाम होतो आहे. स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फ्री, फर्निचर फ्री, घरावर दुचाकीची भेट अशा आॅफर्स असूनही चढ्या दरांमुळे घरांच्या खरेदीवरील मंदीचे मळभ दूर झालेले नाही. वाहनांच्या खरेदीचाही गेल्या सहा महिन्यांतील मंदावलेला वेग तसाच असल्याचे दिसून आले. आरटीओची कार्यालये सदऱ्यानिमित्त मुद्दाम उघडी असली तरी तेथेही फारशी गर्दी नव्हती. वाहनांचे केवळ बुकींग झाल्याने नोंदणीसाठी ग्राहक आरटीओत येण्यास वेळ लागेल, असे तेथील अधिकाऱ्यांनी सांगितले. अर्थात सोने, घरे, वाहने यांची खरेदी पूर्वीसारखी फक्त मुहूर्तावर होत नाही, तर ती आता वर्षभर सुरू असते. त्यामुळे मुहूर्ताच्या खरेदीचा ट्रेंड बदलतो आहे, असेही निरीक्षण विक्रेत्यांनी नोंदवले.दसऱ्यानिमित्त केल्या जाणाऱ्या गृहपयोगी वस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाईल यांच्या खरेदी खरेदीसाठी दुकानांत ग्राहकांची झुंबड होती. आॅनलाईन खरेदीचा ट्रेंड वाढत असूनही ही गर्दी कायम होती. (टीम लोकमत)

सोन्याच्या नाण्यांना मागणी-

सोन्याची मंगळवारी ३० टक्के उलाढाल झाली. यंदा दागिन्यांपेक्षा सोन्याच्या नाण्यांना, वळ््याला अधिक मागणी होती. गेल्या सहा वर्षांत सोन्याला असलेल्या मागणीपेक्षा यंदाची मागणी सर्वात कमी मागणी आहे. जागतिक घडामोडीमुळे यंदा मागणी कमी असल्याचे आॅल इंडिया ट्रेड फेडरेशन असोसिएशनचे पदाधिकारी नितीन कदम यांनी सांगितले.

मुहूर्ताच्या घरखरेदीचा ट्रेंड बदलतोय!

घर खरेदीत आता पहिल्यासारखी परिस्थिती नाही. वर्षभर काही ना काही स्कीम दिल्या जात असल्याने दसऱ्याच्या मुहूर्तावर घरांची सरासरी २० टक्के खरेदी झाल्याची माहिती ठाण्यातील एमसीएचआयचे माजी अध्यक्ष मुकेश सावला यांनी दिली. ठाण्याच्या विविध भागात सध्या नवी गृहसंकुले उभी राहत असली, तरी सर्वाधिक पसंती घोडबंदर भागात घर खरेदीला दिली जात आहे. कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, शहापूर, कसारा आदी भागातील घरांच्या किंमतीवर जरी परिणाम झाला असला, तरी तसा परिणाम ठाण्यात झाला नसल्याचा दावाही त्यांनी केला. पूर्वी दसऱ्याच्या मुहूर्तावर अथवा गुढीपाडव्याला घर खरेदीला पसंती दिली जात होती. परंतु आता विकसक ग्राहकांना वर्षभर ग्राहकांना वेगवेगळ्या स्किम देत असल्याने वर्षभर किंबहुना ज्याच्याकडे जसे पैसे येतील त्यानुसार घर खरेदी केली जात असल्याचेही सावला यांनी सांगितले.

महिलांची वाहनखरेदी अधिक-

यावेळी वाहनांचे बुकींग १ आॅक्टोबरपासून सुरू होते. आगाऊ बुकिंग केलेल्यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहने घरी नेली. यंदा वाहनांच्या खरेदीत ना नफा ना तोटा अशी परिस्थिती दिसून आली. गेल्यावर्षी वाहनांची खरेदी साधारण ८० टक्के झाली होती. ती यंदा ६० टक्क्यांवर पोहोचली. यातही पुरूषांच्या तुलनेत महिलांनी वाहन खरेदी मोठ्या प्रमाणात केल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.