शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सीएसआरचा ६ लाख शिक्षकांना लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2015 23:24 IST

कोट्यवधीची वार्षिक उलाढाल असलेल्या बड्या उद्योजकांनी सामाजिक दायित्व जपण्यासाठी पुढे यावे आणि त्यांच्या नफ्याचा दोन टक्के भाग त्यांनी शालेय गुणवत्ता वाढीस खर्च करावा.

जान्हवी मोर्ये, ठाणेकोट्यवधीची वार्षिक उलाढाल असलेल्या बड्या उद्योजकांनी सामाजिक दायित्व जपण्यासाठी पुढे यावे आणि त्यांच्या नफ्याचा दोन टक्के भाग त्यांनी शालेय गुणवत्ता वाढीस खर्च करावा. त्यासाठी राज्य सरकारने अध्यादेश काढून केलेल्या आवाहनाला उद्योजकांनी उत्तम प्रतिसाद दिल्यामुळे एक लाख शाळांतील सहा लाख शिक्षकांना त्याचा लाभ होणार आहे. यात इन्फोसीस, अगस्त्या फाऊंडेशन, स्टेट बॅक आॅफ इंडिया, आयआयएम अहमदाबाद , रिलायन्स सारख्या कंपन्या पुढे आल्या आहेत. त्यांनी शालेय गुणवत्ता वाढीसाठी कोट्यवधीचा निधी देण्याची तयारी दर्शविली आहे. राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाच्या अवर सचिव रिना फणसेकर यांनी या संदर्भात ही माहिती दिली. राज्य सरकारने ९ जून २०१४ रोजी शालेय गुणवत्ता वाढीसाठी आवाहन केले. त्याला उद्योजकांचा चांगला प्रतिसाद लाभल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.इन्फोसीस या आयटी कंपनीने अगस्त्या फाऊंडेशन या एनजीओ बरोबर सामंजस्यांचा करार केला आहे. तीन वर्षात ही कंपनी एक कोटीचा निधी शालेय गुणवत्ता वाढीवर खर्च करणार आहे. महाराष्ट्रातील सरकारी शाळांतील सुमारे १ हजार विज्ञान विषय शिकविणाऱ्या शिक्षकांना बेंगलोर येथे इन्फोसीसच्या प्रशिक्षण केंद्रात विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमाच्या बाहेर जाऊन विज्ञान विषय अधिक प्रभावीपणे कसा शिकवावा याचे प्रशिक्षण शिक्षकांना दिले जाणार आहे. स्टेट बॅक आॅफ इंडियाने १५०० चौरस फूटाच्या जागेत एक आदर्श प्रयोगशाळा उभारणार आहे. त्यासाठी अडीच कोटीचा निधी बँकेकडून दिला जाणार आहे. यासाठी देखील अगस्त्या फाऊंडेशन ही एनजीओ काम पाहणार आहे. तसेच आयआयएम अहमदाबाद सरकारी शाळांतील शिक्षकांना उत्कृष्ट व्यवस्थापन व आदर्श नोंदी कशा कराव्यात याबाबतचे प्रशिक्षण देणार आहे. शिक्षकांनी लावलेल्या नाविन्यपूर्ण शालेय प्रकल्पाचा शोध घेतला जाणार आहे. या शोधांचे सादरीकरण कसे करावे यांचे ही प्रशिक्षण शिक्षकांना देण्यात येणार आहे. राज्य व देशपातळीवरील नाविन्यपूर्ण शोध प्रकल्पांची एक ‘नॉलेज बँक’ तयार करण्यात येणार आहे. यासाठी ५० लाखांचा निधी वापरला जाणार आहे.रिलायन्स समूहदेखील १०० शाळांना इंटरनेटची सुविधा पुरविणार आहे. आतापर्यत विविध कंपन्यांनी एकूण चार कोटी रुपये शालेय गुणवत्ता वाढीवर खर्च करण्याची तयारी दर्शविली आहे. हे प्रकल्प पूर्णत्वास जातील. कारण कंपन्या बड्या आहेत. त्यांचे व्यवस्थापन उद्योग जगतात परफेक्ट आहे. त्यांच्याकडून कामगारांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम चालविले जातात. ते शैक्षणिक उपक्रमासाठीही परफेक्ट कार्यक्रम राबवितील, असा विश्वास फणसेकर यांनी व्यक्त केला. या उपक्र मातून जवळपास सहा लाख शिक्षक आणि एक लाखांहून अधिक शाळांना त्यांच्या गुणवत्ता वाढीस संधी मिळणार आहे. त्यासाठी सातारा येथील ग्राममंगल संस्थेने मनुष्यबळ पुरविण्याची तयारी दर्शविली आहे. याशिवाय जेएसडब्ल्यू (जिंदाल ) उद्योगाला कोकणातील शालेय गुणवत्ता सुधारण्यात रस असल्याचा कल त्यांनी सरकारला कळविला आहे. शासनाच्या राज्यस्तरीय समितीतर्फे टाटा सारख्या बड्या उद्योगांना सीएसआरअंतर्गत योजनेत सहभागी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ...समाप्त