शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी ठाण्यात जमाव बंदी आदेश

By जितेंद्र कालेकर | Updated: June 28, 2024 20:31 IST

गैरप्रकार रोखण्यासाठी पोलिसांची राहणार करडी नजर: झेरॉक्सची दुकानेही राहणार बंद

जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: येत्या ७ जुलै रोजी ठाण्यातील पाच उपक्रेद्रांवर संघ लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा (इपीएफओ) दोन सत्रांमध्ये होणार आहे. देशभरात सध्या गाजत असलेल्या नीट परीक्षेतील तसेच इतर परीक्षांमधील गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर या परीक्षेमध्ये कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी ठाणे पोलिसांची करडी नजर राहणार आहे. या परीक्षा केंद्रांच्या परिसरात जमाव बंदी लागू केली असून या काळात परिसरातील झेरॉक्स दुकानेही बंद ठेवण्याचे आदेश ठाण्याच्या विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांनी शुक्रवारी काढले आहेत.

आपल्या आदेशामध्ये पोलिस उपायुक्त गोरे यांनी म्हटले आहे की, येत्या ७ जुलै रोजी ठाण्यातील पाच उपकेेंद्रावर ही संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षा दोन सत्रांमध्ये हाेणार आहे. यापूर्वी महाराष्ट्रात काही ठिकाणी परीक्षेदरम्यान १०० मीटर परिसरात बेकायदेशीर जमाव जमून गैरप्रकार झाल्याच्या तसेच परीक्षेत व्यत्यय आल्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरात हा मनाई आदेश लागू केला आहे. या परीक्षेच्या दरम्यान उमेदवारांना नक्कल करण्यास मदत करणारे, व्यत्यय आणणारे आणि गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. परीक्षा चालू असतांना त्याठिकाणी अधिकृतपणे नेमलेले पोलिस अधिकारी, कर्मचारी तसेच परीक्षा केंद्रांवरील अधिकृत अधिकारी, कर्मचारी, परीक्षाथीर् यांच्या खेरीज अन्य कोणालाही केंद्रावर प्रवेशास मनाई राहणार आहे.

त्याचप्रमाणे परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात जमण्यासही प्रतिबंध केला आहे. या परिसरातील झेरॉक्स सेंटर, फॅक्स सेंटर, टेलिफोन बुथ अशी दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मोबाईल फोनसह तत्सम इलेक्ट्राॅनिक्स उपकरणांचा वापर करण्यासही मनाई राहणार आहे. हा आदेश ७ जुलै रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत परीक्षा केंद्रासाठी लागू राहणार आहे. या परिसरात मनाई आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाणार असल्याचेही गोरे यांनी म्हटले आहे.

टॅग्स :examपरीक्षा