शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमध्ये चार डॉक्टरांच्या विरोधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 00:56 IST

खोट्या सही, शिक्क्यानिशी दिले मृत्यू दाखले : कोळसेवाडी पोलिसांकडून तपास सुरू

कल्याण : एका सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांच्या नावाचा सही, शिक्का तयार करून त्याचा गैरवापर करत रुग्णांच्या नातेवाइकांना मृत्यू दाखले दिले जात होते. याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी पूर्वेतील एका खाजगी रुग्णालयातील चार डॉक्टरांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

डॉ. अरुण चंदेल (रा. नेतिवली) हे उल्हासनगरच्या सरकारी रुग्णालयात कार्यरत आहेत. २०१७ पूर्वी ते कल्याण पूर्वेतील साई स्वस्तिक या खाजगी रुग्णालयात रुग्ण तपासणीसाठी येत असत. मात्र, २०१७ नंतर त्यांनी त्या रुग्णालयात व्हिझिट देणे बंद केले आहे. परंतु, त्या रुग्णालयात उपचारावेळी मृत्यू झालेल्या रुग्णाचा मृत्यू दाखला देताना चंदेल यांच्या नावाचा सही, शिक्का वापरण्यात येत होता. एका पोलिसाचे वडील कोविडमुळे मृत्युमुखी पडले. त्यांच्या वडिलांच्या मृत्यू दाखल्यावर चंदेल यांचा सही, शिक्का होता. चर्चेतून ही गोष्ट चंदेल यांच्या कानांवर गेली. त्यांनी तर २०१७ पूर्वीच व्हिझिट देणे बंद केलेले असताना स्वस्तिक रुग्णालयात त्यांच्या नावाचा गैरवापर करून मृत्यूचे दाखले दिले जातआहेत. या प्रकारामुळे त्यांच्यासह रुग्णांच्या नातेवाइकांची फसवणूक केली जात होती.आतापर्यंत किती मृत्यू दाखले दिले?मृत्यूचा दाखला एमडी मेडिसिन वैद्यकीय शैक्षणिक पात्रता असलेल्या डॉक्टरलाच देता येतो. त्यामुळे चंदेल यांनी याप्रकरणी कोळसेवाडी पोलिसात तक्रार दिली.त्यानुसार फसवणूक केल्याच्या आरोपाखाली स्वस्तिक रुग्णालयातील डॉ. स्वप्नील मुंडे, तुषार टेंगणे, सतीश गीते आणि आर.एम. जैस्वाल या चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.जानेवारी २०१७ ते तक्रार दाखल होईपर्यंत किती रुग्णांचे मृत्यू दाखले दिले गेले आहे, याचा शोध पोलिसांकडून घेतला जाणार आहे.

टॅग्स :thaneठाणेdoctorडॉक्टर