शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या पाळतीवर नगरसेवकांचा आक्षेप

By admin | Updated: November 2, 2015 02:53 IST

बिल्डर सूरज परमार प्रकरणात चार नगरसेवकांच्या चुकीमुळे पोलिसांनी सरसकट सर्वच नगरसेवकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे,

अजित मांडके, ठाणेबिल्डर सूरज परमार प्रकरणात चार नगरसेवकांच्या चुकीमुळे पोलिसांनी सरसकट सर्वच नगरसेवकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे, अशी भावना नगरसेवकांच्या वर्तुळात निर्माण होत आहे. चौकशीकरिता स्थायी समिती व महासभेचे इतिवृत्त पोलिसांनी मागणे आणि महापालिका आयुक्तांनी ते उपलब्ध करून देणे, यामुळे नगरसेवकांच्या अधिकारांवर अतिक्रमण होत असल्याची चर्चा ठाण्यात होत आहे.संसद आणि विधिमंडळाच्या सदस्यांप्रमाणे नगरसेवकांना विशेषाधिकार नसले, तरी पोलिसांनी असे इतिवृत्त मागितल्याने व पाळत ठेवण्यासारखे प्रकार झाल्यास भविष्यात कुठल्याही विषयावर बोलताना नगरसेवकांच्या मनात भीतीचे सावट राहील, अशी भीती ते बोलून दाखवत आहेत. त्यामुळेच आता स्थायी समिती आणि महासभेत नगरसेवकांनी बोलायचे की नाही, असा सवाल ते करीत आहेत. विधानसभेत सदस्य एखाद्या कंत्राटदार, पोलीस अधिकारी अथवा बिल्डर उद्योजक यांचे प्रकरण लोकशाही आयुधांच्या माध्यमाने उपस्थित करून कारवाईची मागणी करतात. भविष्यात अशा व्यक्तीने आत्महत्या केली, तर नगरसेवकांचा न्याय आमदारांनाही लागू केला जाईल, अशी भीती नगरसेवक व्यक्त करीत आहेत.ठाणे महापालिकेतील महासभा व स्थायी समितीच्या इतिवृत्ताची मागणी पोलिसांनी केल्यावर, महापालिका आयुक्तांनी नगरसेवकांच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्याकरिता त्यास सपशेल नकार द्यायला हवा होता, असे नगरसेवकांचे मत असल्याचे समजते. याबाबत महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारले असता, पोलिसांच्या चौकशीचा तो भाग असून, ते कुणाचीही चौकशी करू शकतात. पोलिसांनी पालिका अधिकाऱ्यांकडील दस्तावेजांचीही तपासणी सुरू केली आहे. त्यांना सहकार्य करणे हे पालिकेचे काम आहे, असे ते म्हणाले.