शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
2
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
3
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
4
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
5
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
6
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
7
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
8
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
9
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
10
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
11
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
12
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
13
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
14
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
15
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
16
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
17
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
18
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
19
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
20
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

coronavirus: ठाणे महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेचे कोरोनामुळे तीनतेरा, आरोग्य केंद्रे व्हेंटिलेटरवर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2020 1:03 AM

ठाणे शहरात कोरोना रुग्णांची संख्या नऊ हजारांवर गेली आहे. ३४० रुग्णांनी जीव गमावला असून अनेकांना वेळेत उपचारच मिळाले नव्हते.

ठाणे -तीन महिन्यांपासून कोरोनाचा सामना करताना आरोग्य विभागातील पदांची गळती झाली आहे. त्यामुळे कमी मनुष्यबळामुळे डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांवर ताण वाढला आहे. प्रशासनाच्या निष्काळजीचा फटका ठाण्यातील कोरोना रुग्णांना बसला आहे. रूग्णांना वेळेत बेड न मिळणे, अ‍ॅम्ब्युलन्स वेळेत न येणे, यामुळे काहींना आपला जीवही गमवावा लागला आहे. आरोग्य यंत्रणाच आजारी पडल्याचे शहरातील चित्र आहे. ही परिस्थिती सुधारून ठाणेकरांना चांगल्या आरोग्याच्या सुविधा देण्याची मागणी मनसेतर्फे करण्यात आली आहे.ठाणे शहरात कोरोना रुग्णांची संख्या नऊ हजारांवर गेली आहे. ३४० रुग्णांनी जीव गमावला असून अनेकांना वेळेत उपचारच मिळाले नव्हते. पालिकाने प्रभाग समितीनिहाय टीम नेमली आहे, पण त्याचा काहीच फायदा होत नाही. ही टीमही काहीच काम करत नसल्याचे दिसून येत आहे. ठाण्यात ३० आरोग्य केंदे्र आहेत. यामध्ये ३० हून अधिक वैद्यकीय अधिकारी आहेत. पण, या अधिकाऱ्यांवर सर्व जबाबदारी सोपवल्यामुळे काम करणे कठीण जात आहे. कर्मचारी वाढवणे अत्यंत गरजेचे असल्याचे एका वैद्यकीय अधिकाºयाने सांगितले.ठाण्यात एकूण लोकसंख्या २६ लाख आहे. मात्र, पालिकेचे केवळ ३० आरोग्य केंद्रे कार्यरत असून अ‍ॅम्ब्युलन्स सेवाही नाही. या केंद्रातील अधिकाºयाला रुग्णतपासणीपासून कोरोना रुग्णाला रुग्णालय मिळवून देण्यापर्यंतची सर्वच कामे करावी लागत आहेत. यातच वैद्यकीय अधिकाºयांचे दररोज पाच-सहा तास जात असल्यामुळे ते उपचारांच्या सुविधा देण्यात कमी पडत आहेत. त्यामुळे महापालिकेने कर्मचाºयांची संख्या वाढवून रुग्णांना चांगल्या सुविधा देण्याची मागणी मनसेच्या स्वप्नील महिंद्रकर यांनी केली.आपला दवाखाना कागदावरचआपला दवाखाना सुरू करण्याबाबत दोन वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करत प्रायोगिक तत्त्वावर योजना राबवली. पण, अवघ्या सहा महिन्यांत ती अपयशी ठरूनही आणखी ५० दवाखाने उभारण्याची घोषणा केली. ५० दवाखाने यापूर्वीच योग्य उपाययोजनांसह सुरू केले असते, तर कोरोनाच्या लढ्यात हे खूप उपयुक्त ठरले असते. त्यामुळे महापालिकेने याचा विचार करण्याची आवश्यकता असल्याचे मनसेच्या स्वप्नील महिंद्रकर यांनी सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका