Coronavirus: ठाणे जिल्ह्यात मंगळवारी ६०७ रुग्ण आढळले; तिघांचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 20:45 IST2021-03-02T20:45:54+5:302021-03-02T20:45:54+5:30

उल्हासनगरला २१ रुग्ण आढळले असून मृत्यू नाही. आता या शहरात ११ हजार ८८२ बाधीत असून मृत्यू संख्या ३७२ आहे

Coronavirus: 607 patients found in Thane district on Tuesday; Death of three | Coronavirus: ठाणे जिल्ह्यात मंगळवारी ६०७ रुग्ण आढळले; तिघांचा मृत्यू 

Coronavirus: ठाणे जिल्ह्यात मंगळवारी ६०७ रुग्ण आढळले; तिघांचा मृत्यू 

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाचे ६०७ रुग्ण मंगळवारी आढळून आले असून तीन जण दगावले आहेत. आता जिल्ह्यात एकूण रुग्ण संख्या दोन लाख ६६ हजार ९२ झाली असून सहा हजार २०८ मृतांची नोंद झाली आहे. ठाणे शहरात १७८ रुग्ण सापडले आहेत. या शहरात आतापर्यंत ६२ हजार ६५३ रुग्ण नोंदले असून दोन मृत्यू आहे. त्यामुळे मृतांची संख्या एक हजार ३८९ झाली. कल्याण - डोंबिवलीत १५८ रुग्ण आढळून आले असून एक मृत्यू आहे. या शहरात आता ६३ हजार ४८० बाधीत असून एक हजार २०४ मृतांची नोंद आहे.

 उल्हासनगरला २१ रुग्ण आढळले असून मृत्यू नाही. आता या शहरात ११ हजार ८८२ बाधीत असून मृत्यू संख्या ३७२ आहे. भिवंडीला दहा रुग्ण सापडला असून एकही मृत्यू नाही. येथे सहा हजार ८०४ बाधितांची तर, ३५५ मृतांची नोंद आहे. मीरा भाईंदरला ५३ रुग्ण सापडले असून एकही मृत्यू नाही. या शहरात आता २७ हजार १८७ बाधितांसह ८०४ मृतांची संख्या आहे. 

अंबरनाथ शहरात १८ रुग्ण सापडले आहे. तर, एकही मृत्यू नाही. या शहरात आता आठ हजार ८४८ बाधितांसह मृतांची संख्या ३१५ आहे. बदलापूरला २५ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे बाधीत रुग्ण नऊ हजार ९७८ असून एकही मृत्यू नसल्याने मृत्यूची संख्या १२५ आहे. जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात २९ रुग्ण सापडले असून एकही मृत्यू नाही. या गांवपाड्यांत १९ हजार ५९५ बाधीत झाले असून मृत्यू ५९३ आहे.

Web Title: Coronavirus: 607 patients found in Thane district on Tuesday; Death of three