Corona Vaccination: अंबरनाथ-बदलापुरात कोविड लसींचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 12:46 AM2021-04-10T00:46:17+5:302021-04-10T00:46:31+5:30

अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रात लसीकरणासाठी एकच केंद्र असून त्या ठिकाणी दररोज २५० नागरिकांना देण्यात येत आहे. लसीकरण केंद्र वाढवण्याची मागणी अनेक वेळा करूनदेखील प्रशासन फक्त एकाच केंद्रावर लसीकरण करीत आहेत.

Corona Vaccination: Shortage of Covid Vaccines in Ambernath-Badlapur | Corona Vaccination: अंबरनाथ-बदलापुरात कोविड लसींचा तुटवडा

Corona Vaccination: अंबरनाथ-बदलापुरात कोविड लसींचा तुटवडा

Next

अंबरनाथ: अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रात २५० नागरिकांना लस देण्यात येणार आहे. मात्र, अंबरनाथ नगरपालिकेत आता केवळ एक हजार डोस शिल्लक असून ते केवळ चार दिवस पुरणार आहेत. अंबरनाथ नगरपालिकेने पाच हजार डोसची मागणी केली आहे.

अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रात लसीकरणासाठी एकच केंद्र असून त्या ठिकाणी दररोज २५० नागरिकांना देण्यात येत आहे. लसीकरण केंद्र वाढवण्याची मागणी अनेक वेळा करूनदेखील प्रशासन फक्त एकाच केंद्रावर लसीकरण करीत आहेत. जोपर्यंत लसींचा पुरवठा वाढत नाही तोपर्यंत केंद्र वाढविण्यात काही एक अर्थ नसल्याची भूमिका पालिका प्रशासनाने घेतली जात आहे. दररोज हजार नागरिकांना लस देता येईल त्या प्रमाणात पुरवठा व्हावा, अशी मागणी केली आहे. मात्र, लसींचा पुरवठा अल्प असल्याने २५० नागरिकांना त्रास देणे शक्य होत आहे. 

तीन खासगी केंद्रे बंद 
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेकडे एक दिवस पुरेल इतकाच लसींचा साठा असल्याने शुक्रवारी एम्स, ममता, सिद्धिविनायक या खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रांवरील लसीकरण बंद करण्यात आले आहे.

काेविड रुग्णालयांतील उपलब्ध बेड
हाॅस्पिटल    एकूण बेड        उपलब्ध
ठाणे
जिल्हा रुग्णालय (शासकीय)    २००        २३
ग्लोबल (टीएमसी)    १०१०          १८२
पार्किंग प्लाझा (टीएमसी)    १०००         ५९७
कौशल्या हाॅस्पिटल (खासगी)    ७०        ००
वेदांत, जीबी, रोड (खासगी)    ७०         १०
मेट्रो पोल (खासगी)    ६०        ००
कल्याण-डाेंबिवली
आयुष हाॅस्पिटल    ४१        ०१
आयकॉन हाॅस्पिटल    ३९          ०
वैभव मल्टी स्पेशॅलिटी                        ३२                       ००
सिद्धिविनायक हाॅस्पिटल    २८        २८
भिवंडी
खुदाबक्ष हाॅल     १००        ३१
अटलांटिस हाॅस्पिटल    २५          २५
स्वराज्य जननी हाॅस्पिटल                          १३                  ०९
खातून बी काझी हाॅस्पिटल    १४        ०१
अलमाेमीन हाॅस्पिटल                     ३०        ३०
अनमाेल हाॅस्पिटल       ३०          २५
लाइफलाइन वाघमारे हाॅस्पिटल    २५         २३
मढवी हाॅस्पिटल                          २५                   २५

Web Title: Corona Vaccination: Shortage of Covid Vaccines in Ambernath-Badlapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.