शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
3
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
4
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
5
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
6
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
7
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
8
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
9
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
10
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
11
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
12
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
13
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
14
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
15
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
16
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई
17
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
18
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
19
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
20
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!

कोरोनामुळे दोन वृद्धांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2020 12:33 AM

कल्याण : कल्याणमध्ये कोरोनामुळे सोमवारी बैलबाजार परिसरातील ६५ वर्षीय पुरुष आणि टिटवाळा परिसरातील गाळेगावातील ७० वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला. ...

कल्याण : कल्याणमध्ये कोरोनामुळे सोमवारी बैलबाजार परिसरातील ६५ वर्षीय पुरुष आणि टिटवाळा परिसरातील गाळेगावातील ७० वर्षांच्या महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे केडीएमसी हद्दीतील एकूण मृतांची संख्या ३१ झाली आहे. दुसरीकडे ६२ नवे रुग्ण सापडल्याने एकूण रुग्णसंख्या एक हजार ८६ झाली आहे.नवीन ६२ रुग्णांमध्ये कल्याण पूर्वेतील १२, पश्चिमेतील २५, डोंबिवली पूर्वेतील १०, पश्चिमेतील १३ आणि टिटवाळ्यातील दोन दोघे आहेत.त्यापैकी ३८ पुरुष आणि २४ महिला आहे. तर, बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३८३ असून, ६८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.मीरा-भाईंदरमध्ये पाच जणांचा बळीच्मीरा-भार्इंदरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असून या शहरांतील एकूण रुग्णसंख्या ७३८ वर गेली आहे. रविवारी एका दिवसात ८९ नवे रुग्ण, तर पाच जणांचा बळी गेल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.च्रविवारी रात्री उशिरा मिळालेल्या आकडेवारीनुसार, मृतांची एकूण संख्या २९ झाली आहे. तर दिवसभरात १९ रुग्ण बरे झाले. कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ४२४ झाली आहे. तसेच १९४ जणांचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे. शहरात नियमांचे पालन होत नसल्यामुळे कोरोनाचा धोका वाढत आहे.उल्हासनगरमध्ये २० नवे रुग्ण, एकाचा मृत्यूउल्हासनगर : उल्हासनगरात कोरोनाचे २० नवे रुग्ण सापडले आहेत, तर एका रुग्णाचा मृत्यू झाला. उल्हासनगर कॅम्प नं. १ मध्ये रमजपो आश्रम व अमृतपर्व परिसरात ३, कॅम्प नं. २ येथील खेमानी रोड ४, रमाबाई आंबेडकरनगर येथे ६, हिरा मॅरेज हॉल १, चोपडा कोर्ट परिसर १, कॅम्प नं. ३ येथील ओटी सेक्शन १, आंबेडकरनगर-३ व आनंदनगर १ असे २० रुग्ण सोमवारी आढळले. आतापर्यंत तर १४६ जण कोरोनामुक्त झाले, तर १२ जणांचा मृत्यू झाला आहे.