अवास्तव देयक आल्याने ग्राहकांची ‘महावितरण’वर गर्दी!

By Admin | Updated: October 13, 2016 03:31 IST2016-10-13T03:31:41+5:302016-10-13T03:31:41+5:30

अवाजवी देयक आल्याने येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात जाब विचारण्यासाठी ग्राहकांनी एकच गर्दी केली. कनिष्ठ अभियंता गणेश पवार यांनी त्याचे कारण पटवून देत ग्राहकांचे समाधान

Consumers 'Mahavitaran' rallied due to unrealistic payment! | अवास्तव देयक आल्याने ग्राहकांची ‘महावितरण’वर गर्दी!

अवास्तव देयक आल्याने ग्राहकांची ‘महावितरण’वर गर्दी!

टिटवाळा : अवाजवी देयक आल्याने येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात जाब विचारण्यासाठी ग्राहकांनी एकच गर्दी केली. कनिष्ठ अभियंता गणेश पवार यांनी त्याचे कारण पटवून देत ग्राहकांचे समाधान केले.
महावितरणने महिन्याभरापूर्वी मीटर रीडिंगसाठी नवे सॉफ्टवेअर सुरू केले. या सॉफ्टवेअरचे काम अद्याप सुरू असल्याने ग्राहकांना ४० दिवसांचे देयक देण्यात आले. त्यामुळे संभ्रमात पडलेल्या ग्राहकांनी जाब विचारण्यासाठी महावितरणच्या टिटवाळा कार्यालयात गर्दी केली. येथील कनिष्ठ अभियंता गणेश पवार यांनी ग्राहकांना यामागची तांत्रिक कारणे समजावून सांगितली. ग्राहकांना या वेळी ४० दिवसांचे देयक दिले असले तरी पुढील महिन्यात फक्त २० दिवसांचेच देयक दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. पूर्ण समाधान झाल्यानंतर ग्राहकांनी देयक भरण्यास सहमती दर्शवली. (वार्ताहर)

Web Title: Consumers 'Mahavitaran' rallied due to unrealistic payment!